महाराष्ट्र
Trending

नागपूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस: अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो, शहरातील सखल भागांत गुडघाभर पाणी ! जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३- महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहराला मध्यरात्री मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. रात्री २ ते ३ वाजेदरम्यान पावसाचा जोर सर्वाधिक होता. चार तासांत १०० मिमी पावसाची नोंद झाली. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले होते.

नागपूर शहरांमध्ये रात्री दोन वाजेपासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा व महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना ( जिल्हा व महानगर क्षेत्र ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे.

नागपुरात रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काही सखल भागाची पाहणी केली. तसेच बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधला.

नागपुरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून बचाव कार्य केले जात आहे. मनपाद्वारे मदतकार्य केल्या जात आहे. मनपाच्या चमुद्वारे मोरभवन बस स्टॉप येथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंचशील चौकात पाणी साचले होते.

Back to top button
error: Content is protected !!