छत्रपती संभाजीनगर

बापानेच पोटच्या पोराला ठार मारलं, दारू ढोसून अश्लिल शिवीगाळ व मारहाणीस कंटाळून उचलले टोकाचे पाऊल ! छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमधील खळबळजनक घटना, १२ तासांत बापाला बेड्या ठोकल्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – दारू पिवून मारहाण व रोज अश्लिल शिवीगाळास कंटाळून बापाने पोटच्या पोराचा खून केल्याची खळबळजनक घटना न्यू साई नगर, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे घडली. सुरुवातीला मुलाचा कुणीतरी खून केल्याचा बनाव करत पोलीस ठाण्यात मुलाच्या खूनाची फिर्याद बापाने दिली. मात्र, पोलिसांनी तपासादरम्यान अवघ्या १२ तासांत बापानेच मुलाचा खून केल्याचा उलगडा केला. याप्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

राजू शेणफड उफाड (वय ५२, धंदा मिस्री, रा. न्यू साईनगर, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर राजू उफाड (वय २५ वर्षे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. छावणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २२/०९/२०२३ रोजी यातिल फिर्यादी राजु शेणफड ऊफाड यांनी पोलीस स्टेशन छावणी येथे येवून फिर्याद दिली की, दिनांक २१/०९/२०२३ रोजी रात्री ०९:०० वाजेच्या सुमारास मी व माझा मुलगा आकाश असे सोबत जेवण करुन आकाश समोरच्या हॉलमध्ये बाजेवर झोपला व मी जवळच असलेल्या मागच्या बेडरुमध्ये जमीनीवर झोपलो.

दि. २२/०९/२०२३ रोजी रात्री ०३:३० वाजता मी लघवी करण्यासाठी झोपेतून उठलो असता, माझा मुलगा आकाश हा हॉलमधील बाजेवर झोपलेला होता. त्यावेळी मला त्याची बाजेखाली फरशीवर रक्त पडलेले दिसले असता मी आकाशकडे पाहिले तेंव्हा त्याच्या डोक्याचे उजवे बाजुचे भुवयी व उजव्या कानाच्या वर चाळयावर कोणत्या तरी हत्याराने मारून त्यास जखमी केलेले दिसले. तेव्हा मी आकाशला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु आकाश उठला नाही. मी त्याच्या नाकाला हात लावून पाहिला तेंव्हा त्याचा श्वास बंद असल्याचे मला समजले.

तेंव्हा मला आकाशचा कुणीतरी खून केला असल्याचा संशय आला या आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन छावणी, छत्रपती संभाजीनगर येथे गुरनं ४५८/२०२३ कलम ३०२ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास पोउपनी प्रमोद देवकते करीत आहे. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान घटनास्थळावरील भौतीक पुराव्यावरुन व फिर्यादी यांचे अंगावरील जखमा तसेच त्यांचे हावभावावरून फिर्यादीचा सदर खूनामध्ये काहीतरी हस्तक्षेप असल्याचे दिसून आले.

तसेच फिर्यादी हा पोलिसांना प्रत्येक वेळी वेगवेगळी व विसंगत अशी माहिती देत होता, म्हणुन संशय आल्याने फिर्यादी यांना विश्वासात घेवून अधिकची विचारपुरस केली असता, फिर्यादी यांनी सांगीतले की, माझा मुलगा मला दररोज दारु पिवून अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन मारहाण करत असे. मी त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळलो होतो. दि. २१/०९/२०२३ रोजी ०९:०० वाजता सुद्वा त्याने माझ्याशी वाद घालून मला मारहाण केल्याने मी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच माझी पत्नी व मोठा मुलगा गौरी गणपती सणामुळे मुलीच्या घरी बाहेरगावी गेलेले असल्याचा फायदा घेवून माझा मुलगा आकाश हा रात्री उशीरा झोपलेला असताना त्याच्या डोक्यात हात्याराने वार करुन त्याचा खून केला असल्याचे सांगितले आहे. त्यावरुन फिर्यादी हेच आरोपी असल्याने निष्पन्न झाल्याने फिर्यादी राजु शेणफड ऊफाड यास अटक करण्यात आली असून सदरचा गुन्हा हा गुन्हा घडल्यापासुन तात्काळ १२ तासांच्या आत उघडकीस आणला आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहा. पोलीस आयुक्त अशोक थोरात, छावणी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, स. पो. नी पांडुरंग भागीले, पोउपनी गणेश केदार, प्रमोद देवकते, रावसाहेब जोंधळे, विक्रमसिंह चव्हाण, श्रेणी पोउपनी बाबासाहेब रत्नपारखे, पोह प्रकाश बावस्कर, सफौ नामदेव दळवी, पोना नारायण पायघण, पोना सिद्वार्थ थोरात, पोअ सुमेध पवार, पोअ मंगेश शिंदे, पोअ शपीक शेख पोअ नवनाथ पवार यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!