छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ – नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत असून पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दुपारी १२ वाजता जायकवाडी धरणात ५५.९९ टक्के साठो होता तर ८४ हजार ४४६ क्युसेसने पाण्याची धरणात आवक सुरु होते. दरम्यान, गोदाकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नेवरगांव, हैबतपूर, अगरकानडगांव, ममदापूर, जामगांव, कायगांव, अंमळनेर, लखमापूर, गळलिंब, अगरवाडगांव, भिवधानोरा, लक्ष्मीखेडा, शंकरपूर या गावांना गंगापूर तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्हातील विविध धरणातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे गंगापूर तालुक्यातील गोदावरी काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याच्या विसर्गामुळे जीवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने १. सरपंच २. तलाठी ३. ग्रामसेवक ४. कृषी सहाय्यक ५. पोलिस पाटील ६. राशन दुकानदार यांनी गंगापूर तालुक्यातील नदी काठचे गावे नेवरगांव, हैबतपूर, अगरकानडगांव, ममदापूर, जामगांव, कायगांव, अंमळनेर, लखमापूर, गळलिंब, अगरवाडगांव, शंकरपूर, भिवधानोरा, लक्ष्मीखेडा येथे हजर राहून तेथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत.

आपल्या स्तरावरुन तात्काळ सूचना द्याव्यात जेणे करून जीवित हाणी व पशु हाणी होणार नाही यांची गांभर्भीयांने दक्षता घ्यावी सदर कामांत दिरंगाई केल्यास केंद्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल यांची गांभीर्याने नोंद घ्यावी सर्व संधित ग्रामसेवक यांनी तातडीने सदर आशयाची दवंडी द्यावी, तसेच समाज मंदिरातील स्पीकरव्दारे ही गावक-यांना सूचित करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!