महावितरणच्या गांधेली उपकेंद्राचा गौरव, उपकेंद्रातील विद्युत संच मांडणी सुस्थितीत व सुरक्षित !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ : विद्युत सुरक्षेसाठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 33 केव्ही गांधेली उपकेंद्राचा विद्युत निरीक्षण विभागाने प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.
राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाने 2023-24 या वर्षासाठी गांधेली उपकेंद्राचे निरीक्षण केले. यावेळी विद्युत अधिनियम-2003 व केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्युतपुरवठ्यासंबंधीचे उपाय) विनियम-2023 मधील तरतुदीचे पालन उपकेंद्राचे झालेले आहे. उपकेंद्रातील विद्युत संच मांडणी सुस्थितीत व सुरक्षित असल्याचे तसेच विविध नोंदवह्या अद्ययावत असल्याचे आढळले. महावितरणकडून उपकेंद्रात उल्लेखनीय काम झाले असून, शासनाचे शून्य अपघात धोरण आपण अंगीकृत केले असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.
विद्युत निरीक्षक नि.वा. मदाने यांनी महावितरणच्या ग्रामीण-2 उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंके, चिकलठाणा ग्रामीण शाखेचे सहायक अभियंता मनीष डिघुळे, प्रधान यंत्रचालक श्रावण कोळनूरकर, यंत्रचालक देवीदास पहिनकर, सागर शास्त्री, संजीवनी पाटील यांचा वैयक्तिक प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe