छत्रपती संभाजीनगर
Trending

सातारा परिसरातील हॉटेलचालकाला दगडाने मारहाण ! काऊंटरवरील लाडू फोडू नको, तुला घ्यायचे असेल तर घे असे म्हणताच रागाचा पारा चढला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – काऊंटरवरील लाडु फोडु नको, तुला घ्यायचे असेल तर घे असे म्हणताच राग आला. सुरुवातीला शिवीगाळ आणि नंतर बाहेर ये असे धमकावून हॉटेलचालकाला दगडाने मारहाण केल्याची घटना शहरात घडली.

ही घटना १३ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लोकनगर सातारा परिसर येथे घडली. मिलिंद (रा. देवळाई) असे आरोपीचे नाव आहे. हरिभाऊ रामा अवचार (वय ६५, रा. अलोकनगर, सातारा परिसर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिभाऊ रामा अवचार हे त्यांच्या हॉटेलमध्ये बसलेले होते. याचवेळी मिलिंद याने हॉटेलमधील काँऊन्टरवर ठेवलेल्या लाडुला हात लाऊन लाडु फोडले. यामुळे हरिभाऊ रामा अवचार हे मिलिंदला म्हणाले की लाडु फोडु नको, तुला घ्यायचे असेल तर घे असे म्हणाताच मिलिंदने हरिभाऊ रामा अवचार यास शिवीगाळ सुरु केली. तू बाहेर ये अशी धमकीही दिली.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

हरिभाऊ रामा अवचार हे त्यांच्या हॉटेलच्या बाहेर आल्यावर मिलिंदने बाजुला पडलेला दगड उचलला. हरिभाऊ रामा अवचार यांच्या डाव्या कानाच्या मागे व पोटावर दगडाने मारुन जखमी केले. यामुळे हरिभाऊ रामा अवचार यांच्या कानाच्या मागे टाके पडले आहे. तसेच मिलिंद याने काँऊन्टरला दगड मारले. त्यानंतर मिलिंदने जाताना संध्याकाळी येऊन परत मारतो अशी धमकी दिली.

हरिभाऊ रामा अवचार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिलिंदवर सातारा पोलिस ठाण्यात 441/2020 कलम 324,504, 506 ,427 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!