टॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

कन्नड घाटात वेशभूषा बदलून तर वेरुळ घाटात मुसळधार पावसाचा फायदा घेऊन फरार झालेला अवैध गर्भपात प्रकरणातील डॉक्टर अखेर जेरबंद !!

अवैध गर्भपात प्रकरणातील दीड महिन्यापासून फरार मुख्य सूत्रधार आरोपी डॉक्टरला जळगाव येथून अटक, जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३: अवैध गर्भपात प्रकरणातील दीड महिन्यापासून फरार मुख्य सूत्रधार आरोपी डॉक्टरला जळगाव येथून अटक करण्यात जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. कन्नड घाटात वेशभूषा बदलून तर वेरुळ घाटात मुसळधार पावसाचा फायदा घेऊन त्याने यापूर्वी पोलिसांना गुंगारा दिला होता. आरोपी शोधासाठी सदर पथक हे जळगाव, धुळे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फार्म हाऊस, हॉटेल, लॉजेस व इतर ठिकाणी कसून शोध घेत होते. दरम्यान, दीड महिन्यानंतर पोलिसांना यश आले.

डॉक्टर दिलीपसिंग चतरसिंग राजपुत (रा.भोकरदन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस ठाणे भोकरदन येथे दिनांक 07/07/2024 रोजी दाखल अवैध गर्भपात गुन्ह्यामधील मुख्य सूत्रधार आरोपी डॉक्टर दिलीपसिंग चतरसिंग राजपुत (रा.भोकरदन) याचा शोध घेऊन त्यास अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना दिल्या होत्या.

पो.नि. पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले. गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा घडल्यापासुन दीड महिन्यापासून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी स्थागुशाच्या पथकाने राज्यातील विविध जिल्ह्यांत गुप्त खबरी, बातमीदार नेमून व तांत्रिक विश्लेषन करून आरोपीचा कसून शोध घेत असताना आरोपी डॉक्टर हा छत्रपती संभाजीनगर कडून चाळीसगावकडे कन्नड घाट मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्या प्रमाणे पथकाने कन्नड घाटात सापळा लावला असता आरोपी डॉक्टर वेशभुषा बदलेली असल्याने निसटला. तसेच आरोपी डॉक्टर हा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे (गुढे) येथील एका फार्म हाऊस येथे असल्याची माहिती मिळाली.

पथकाने सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला डॉक्टर आरोपी तेथूनही फरार झाल्याचे लक्षात आले. आरोपी डॉक्टर हा दिसेंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्याने वाहनाने प्रवास करून पथकास गुंगारा देत होता. मागच्या दोन दिवसांपूर्वी आरोपी डॉक्टर हा छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास भागातील सोसायटी मधील अलिशान फ्लॅटकडे येणार असल्याची माहिती मिळाली पथक सापळा लावून रोडवर थांबले असता, आरोपी डॉक्टर यास पोलीस पथकाचा संशय आल्याने त्याने त्याच्या कडील वाहनाने पथकाचे वाहनास हुलकावणी देऊन पळून गेला. आरोपी डॉक्टर ने हुलकावणी दिलेल्या वाहनाचा कसून शोध घेत असतांना सदर वाहन हे दिनांक 21/08/2024 रोजी रात्रीच्या वेळी दौलताबाद-वेरुळलेणी घाटात दिसल्याने वाहनाचा पाठलाग केला परंतु रोडवरील जास्तीचे रहदारी व मुसळधार पावसाचा फायदा घेऊन आरोपी डॉक्टर वाहनासह निसटला. पथकाने परत दौलताबाद ते धुळे व नंतर जळगाव जिल्ह्यात आरोपी डॉक्टरचा शोध घेतला.

दिनांक 22/08/2024 रोजी आरोपी डॉक्टरचा जळगाव जिल्ह्यात पथक शोध घेत असताना तपास पथकास गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, आरोपी डॉक्टर दिलीपसिंग चतरसिंग राजपुत हा मोजे पळसखेडा मिराची ता. जामनेर जि. जळगाव गावात असल्याची माहिती मिळाली. आरोपी डॉक्टर दिलीपसिंग राजपुत याचा पळसखेडा मिराची गावात व परिसरात शोध घेत असताना तो पळसखेडा मिराची ते जळगाव जाणारे रोड वर एका शेतात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने शेताला वेढा टाकून रात्रीच्या आंधारात शेताचा परिसर पिंजून काढून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यास ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, पो.नि. पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश उबाळे, शांतीलाल चव्हाण, पोहवा सम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, सागर बावीस्कर, धिरज भोसले, योगेश सहाने, चालक रमेश पैठणे, सौरभ मुळे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!