वैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील अवैध धंद्यांना चाप, शिवूर बंगला परिसरात मटका अड्यावर धाड, १३ जणांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ -पोलीस ठाणे शिवूर हद्दीत अवैध धंद्याची गोपनिय माहीती काढून पोलिसांनी शिवूर बंगला येथे चालु असलेला अवैध कल्याण मटका जुगार अड्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये छापा मारुन कारवाई केली. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, महक स्वामी सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.3/4/2023 रोजी ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत १)सतीश उत्तमराव जाधव, २) ज्ञानेश्वर बाबुराव सोनवणे, 3)संभाजी छबुराव जाधव, 4) उत्तम सांडू भवर, 5 गणपत श्यामराव पवार 6 संतोष नाना पठारे 7 समाधान गौतम वंजारी 8 भानुदास अश्रू पठारे 9 गोकुळ हरिभाऊ गोरे 10 चंद्रभान तुकाराम पवार 11 इब्राहिम इक्रोमोद्दिन शेख 12 आसाराम रामकिसन पगारे हे मिळून आले. व संजय कारभारी जाधव हा पोलिसांना पाहून पळून गेला.
एकूण 13 आरोपीताना विरुद्ध कल्याण नावाचा मटका खेळ खेळताना व खेळविताना मिळून आले.

त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाईमध्ये 3 मोटार सायकल, 11 मोबाईल व नगदी असा एकूण 144490 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस ठाणे शिवूर करत आहेत.

ही कारवाई मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक, महक स्वामी ( भापोसे) सहायक पोलीस अधीक्षक उपविभाग वैजापूर यांच्या मार्गदर्शाखाली पोउपनि काळे, पोअं जोनवाल, पोअं गायकवाड, पोअं सरोदे ,पोअं मोरे नेमणूक सहायक पोलीस अधीक्षक कार्यालय उपविभाग वैजापूर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!