छत्रपती संभाजीनगर
Trending

कलेक्टर ऑफिस समोरील भारत स्काऊट गाईडचे कार्यालय चोरट्यांनी फोडले ! अशोकाच्या झाडावर चढून पहिल्या मजल्यावरील स्वयंपकाचे व कौशल्य प्रशिक्षणाचे साहित्य केले लंपास !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४- छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारत स्काउट गाईडचे कार्यालय फोडून चोरट्यांनी  स्वयंपकाचे साहित्य व कौशल्य प्रशिक्षणाचे साहित्य लंपास केले. कार्यालयातील कर्मचार्यांना कंपाऊंडच्या गेटचे कुलूप उघडेपर्यंत चोरटे पसार झाले. भारत स्काऊट गाईड कार्यालयाच्या इमारती समोरील अशोकाच्या झाडावर चढून पहिल्या मजल्यावर उतरून स्टोर रुममधील स्वयंपकाचे साहित्य व कौशल्य प्रशिक्षणाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. सकाळी ६.३० वाजता ही घटना घडली. सरकारी कार्यालय फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विजय नरसिंग गुसिंगे ( वरिष्ठ लिपीक) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, औरंगाबाद भारत स्काउट गाईड (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगाबाद) तर्फे शिक्षक व विद्यार्थी यांच्या शिबीरासाठी वापरण्यात येणारे क्रीडाविषयक / कौशल्य साहित्य ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरील असलेल्या स्टोर रुमध्ये ठेवले होते. या साहित्याची पाहणी वरिष्ठ लिपीक विजय नरसिंग गुसिंगे दि. 11/08/2023 रोजी सायंकाळी 05.00 वाजेच्या सुमारास केली. पाहणी करुन सदरील रुमला कुलुप लावून वरिष्ठ लिपीक विजय नरसिंग गुसिंगे हे निघून गेले.

दि. 13/08/20023 रोजी सकाळी 06.30 वाजेच्या सुमारास वरिष्ठ लिपीक विजय नरसिंग गुसिंगे व सहकारी स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव निमीत्ताने कार्यालया समोर ध्वजारोहन करण्यासाठी आले असता स्काउड गाईडच्या कंपाउंडमध्ये दोन जण गोणीमध्ये काहीतरी सामान घेउन जात असल्याचे दिसले. त्यावेळी वरिष्ठ लिपीक विजय नरसिंग गुसिंगे यांनी ऑफिसच्या कंपाउंडच्या गेटचे कुलुप उघडुन आत प्रवेश करे पर्यंत सदरील दोन जण हे कंपाउंडच्या वरून उडी मारून तेथून पळून गेले.

वरिष्ठ लिपीक विजय नरसिंग गुसिंगे व सहकार्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते पळून गेले. कार्यालयातील स्टाफला संशय आल्याने त्यांनी ऑफिस व पहिल्या मजल्यावरील स्टोर रुमची पाहणी केली असता त्यांना स्टोर रुमचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. रुमध्ये ठेवलेले स्वयंपकाचे साहित्य व कौशल्य प्रशिक्षणाचे साहित्य दिसून आले नाही. कार्यालयाच्या आवारातून पळून गेलेले दोन अनोळखी चोरांनी सामानाची चोरी केली असावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लोखंडी पहार, 04 तवे, अॅल्युमिनीयमचे पातेले, पान्हा, लोखंडी कु-हाड, गॅस शेगडी आदी सामान एकूण 19800/- रुपये किमतीचा माल चोरीस गेला. याप्रकरणी वरिष्ठ लिपीक विजय नरसिंग गुसिंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!