महाराष्ट्र
Trending

रिक्षा चालकाकडून लाच घेताना टपरी चालक लाचेच्या सापळ्यात ! बीड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिसाचा पंटर रंगेहात पकडला !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २९- घोडका राजुरी (तालुका जिल्हा बीड) ते बीड शहर या रस्त्यावर ऑटोने प्रवासी वाहतूक करू देण्यासाठी दर महिना हप्त्याची लाच स्वीकारताना टपरी चालकास रंगेहात पकडण्यात आले. बीड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिस शिपायासाठी टपरी चालकाने लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ही कारवाई केली. टपरी चालक व पोलिस शिवायावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

1.अनिल कचरू घटमल (वय 32 वर्षे पोलीस शिपाई, पोलिस स्टेशन बीड ग्रामीण, राहणार – पोलिस कॉलनी बशीरगंज बीड),
2. अनिकेत सुभाष कवडे (वय-23 वर्षे व्यवसाय- टपरी चालक रामनगर ता. जि.बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार ऑटो चालक (वय 50 वर्षे) यांचा स्वतःचा ऑटो असून ते त्यांचे राहते गाव घोडका राजुरी (तालुका जिल्हा बीड) ते बीड शहर या रस्त्यावर त्याचे ऑटोने प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्या ऑटोने सदर रोडवर प्रवासी वाहतूक सुरळीतपणे करू देण्यासाठी व कोणतीही पोलिस कारवाई न करण्यासाठी प्रती महिना 300 रुपये प्रमाणे दोन महिन्याची 600 रुपये हप्त्याची लाच रक्कम आलोसे क्रमांक 1 घटमल यांनी पंचा समक्ष मागितली व आलोसे क्रमांक 2 अनिकेत कवडे पान टपरी चालक यास देण्याबाबत सांगितले.

आलोसे क्रमांक 2 कवडे यास लाच रक्कम 600 रुपये घेताना पंचा समक्ष रंगेहात पकडले. आरोपी पोलिस शिपाई अनिल घटमल व टपरी चालक अनिकेत कवडे यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस स्टेशन बीड शहर येथे सुरू आहे.

ही कारवाई संदिप आटोळे पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, राजीव तळेकर, प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक, शंकर शिंदे
पोलिस उपअधिक्षक, ला.प्र.वि बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – गुलाब बाचेवाड, पोलिस निरीक्षक ला.प्र.वि. बीड, सहसापळा अधिकारी -युनुस शेख, कारवाई पथक – अमलदार सुरेश सांगळे ,खेत्रे,श्रीराम गिराम, भरत गारदे, कोरडे, खरसाडे, अविनाश गवळी,चालक-अंबादास पुरी यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!