छत्रपती संभाजीनगर
Trending

जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेला छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश !

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि. 27 : छत्रपती संभाजीनगर विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद कडील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधिक्षक अभियंता अजय सिंह, जलजीवन मिशन आणि जिल्हा परिषदेचे आठ जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनाची कामे बंद पडली आहेत, त्याचा आढावा घेऊन ती कामे पुन्हा तात्काळ सुरू करावीत. ज्या कामाचे कार्यादेश दिले आहेत ती कामे पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण संनियंत्रण करावे. तसेच जे ठेकेदार कामे पुर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

घरगुती नळजोडणीची कामे दर्जेदार व्हावी, याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. ‘हर घर जल’ योजनाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. ‘हर घर जल’ झालेल्या गावांनी एक्स, इंस्टाग्राम व फेसबुक या समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी द्यावी. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणी पुरवठा योजनाना निधीची कमतरता नाही, त्यामुळे कामे जलदगतीने व दर्जेदार करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!