महाराष्ट्र
Trending

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करण्याचे निर्देश ! अमरावती जिल्ह्यात विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक !!

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबईदि. 7 राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित करण्यात यावीअसे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

अमरावती जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात स्वतंत्र दिव्यांग  विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून या विद्यापीठाच्या कामाला गती यावी. त्यासाठी समिती गठित करण्यात येईल, अशीही माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील दिली.

यावेळी आमदार बच्चू कडूउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीउपसचिव अजित बाविस्करउच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!