गंगापूरछत्रपती संभाजीनगर

गंगापूर पोलिस ठाण्यातून मूळ तक्रारदार पसार ! भूमी अभिलेखच्या उप अधिक्षकांने ३० हजार लाच घेतल्याची फिर्याद प्रक्रिया सुरु असताना केला पोबारा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – जमीन मोजणी करूण देण्यासाठी गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधिक्षकांना ३० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर ज्या मूळ तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधिक्षकांची तक्रार केली होती त्या तक्रारीवर सापळा टाकून भूमी अभिलेखचे उप अधिक्षक यांना पकडण्यात आले. त्यानंतर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना गवळी फुलशिवरा येथील मुळ तक्रारदार हे लघुशंकेचे कारण सांगून तेथून गेले ते परत आलेच नाही. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांना सरकारी पक्षातर्फे गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक गोरखनाथ पोपट गांगुर्डे यांनी दिलेली माहिती अशी की, मुळ तक्रारदारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने साळुबा लक्ष्मण वेताळ (वय 51 वर्ष धंदा नौकरी, पद- उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय गंगापूर औरंगाबाद. रा. रो हाऊस क्रमांक 06 श्री रेसीडन्सी पिसादेवी, औरंगाबाद) यांच्या विरुध्द लाचमागणी पडताळणी करुन यशस्वी सापळा कारवाई केली.

त्यानंतर सविस्तर पंचनामे करून भूमी अभिलखचे उप अधिक्षक साळुबा वेताळ यांच्या विरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल करण्यासाठी कारवाईची प्रक्रिया सुरु होती. प्रक्रिया सुरु असताना मुळ तक्रारदार हे लघुशंका करीता जाणे आहे असे सांगून ते व त्यांचे मित्र पोलीस स्टेशन गंगापूरच्या आवारातून निघुन गेले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी मूळ तक्रारदार व त्यांचा मित्र यांना उप अधिक्षक वेताळ यांच्या विरुध्द कायदेशीर तक्रार देण्याकरीता वारंवार मोबाईल फोनवरुन संपर्क केला. परंतु ते दोघेही उप अधिक्षक वेताळ यांच्या विरुध्द तक्रार देण्याकरीता पोलीस स्टेशन गंगापूर येथे हजर झाले नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिली.

घटनेची हकीकत अशी की, दिनांक 06/02/2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी कक्षात हजर असताना वरिष्ठांच्या आदेशाने कक्षातमध्ये दोन जण आले. त्यावेळी आम्ही त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता गवळी फुलशिवरा (लासूर स्टेशन जवळ, गंगापूर औरंगाबाद) व रा. रांजणगांव (औरंगाबाद) येथील असल्याचे ते म्हणाले. यातील गवळी फुलशिवरा येथील त्या मूळ तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांना सांगितले की, माझी एका शासकीय अधिकारी विरुध्द तक्रार आहे. ते शासकीय अधिकारी माझ्याकडे माझ्या वडीलांचे नावे गवळी फुलशिवार (लासुर स्टेशन औरंगाबाद) येथे जमीन असून सदर जमीन मोजणी करुन देण्यासाठी माझ्याकडे ते अधिकारी 40000/- रुपये लाचेची मागणी करीत आहे.

त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती केली. त्यानंतर आम्ही त्यांना सांगीतले का तुम्ही तोंडी कथन केलेली तक्रार आम्हास लेखी स्वरुपात लिहुन द्यावी. त्यावेळी गवळी फुलशिवरा येथील तक्रारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक गोरखनाथ पोपट गांगुर्डे यांना म्हणले की, साहेब मला मराठी नीट लिहीता येत नाही परंतु मराठी चांगल्या प्रकारे समजते व वाचन करता येते. त्यामुळे आपण माझी तक्रार मराठी संगणकावर टाईप करुन घ्यावी ही विनंती गवळी फुलशिवरा येथील मूळ तक्रारदाराने केली.

त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईचे नियोजन केले. तक्रारीच्या अनुषंगाने वेताळ यांची लाचमागणी पडताळणी करण्यासाठी उप अधिक्षक भूमीअभिलेख कार्यालय गंगापुर येथे जाण्यासाठी सापळा रचला. त्याअनुषंगाने पथक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय औरंगाबाद येथून चारचाकी वाहनाने गंगापूरकडे रवाना झाले. काही वेळाने गंगापूरच्या अलीकडे लासुर रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ पथक थांबले. सदर ठिकाणी पथकाला सविस्तर सूचना देण्यात आल्या. त्यानंतर उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय गंगापूरकडे पथक चारचाकी वाहनाने 15.24 वाजता रवाना झाले. दरम्यान, तडजोडीअंती 35000/- रुपये पंचांसमक्ष लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.

त्याबाबत सविस्तर पंचनामा वेळेअभावी नंतर करण्याबाबत निर्णय घेतला. त्यानंतर सापळा पथक व पंचाना सापळा कारवाई बाबत थोडक्यात माहीती दिली व वेताळ यांनी लाच स्वीकरल्यानंतरचा नियोजीत इशारा करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार व पंच सुरक्षित ठिकाणाहून चारचाकी वाहनाने 17.42 वाजता भूमी अभिलेख कार्यालय गंगापूर येथे रवाना झाले. त्यांच्या पाठोपाठ पथक रवाना झाले. सदर परिसरात सापळा लावून थांबले. काही वेळात तक्रारदार यांनी पूर्वनियोजित इशारा केला. त्यानंतर पथक उप अधिक्षक भूमी अभिलेख यांच्या कक्षात धडकले. 30,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. आहे.

लाच घेणार्या व्यक्तीने त्यांचे नाव साळुबा लक्ष्मण वेताळ (वय 51 वर्ष धंदा नौकरी, पद- उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय गंगापुर औरंगाबाद रा रो हाऊस क्रमांक 06, श्री रेसीडन्सी पिसादेवी, औरंगाबाद) असे सांगितले. त्यानंतर पथक व गवळी फुलशिवरा येथील मूळ तक्रारदार गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता मूळ तक्रारदार व त्यांचा मित्र गंगापूर पोलिस ठाण्याच्या आवारातून लघू शंकेच्या नावाखाली पळून गेले. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सरकार पक्षातर्फे गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Back to top button
error: Content is protected !!