महाराष्ट्र
Trending

बदनापूर तालुक्यातील नानेगावच्या शेतकऱ्यावर गुप्तीने हल्ला ! शेत रस्त्याच्या वादातून बैलगाडीतील खताच्या गोण्याही पळवल्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून बदनापूर तालुक्यातील नानेगाावच्या शेतकऱ्यावर गुप्ती सारख्या शस्राने हल्ला चढवल्याची घडना घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून ऐन पेरणीच्या मौसमात खताच्या गोण्या पळवल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.

अमोल राधाकिसन चव्हाण (वय 32 वर्ष व्यवसाय शेती रा. नानेगाव ता. बदनापूर जि. जालना) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. अमोल चव्हाण यांनी बदनापूर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गट नं 203 शिवारात नानेगाव येथे त्यांची शेती आहे. अमोल चव्हाण यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता संतोष दिगंबर चव्हाण याने आडवलेला आहे. दि 09/07/2023 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान पेरणीसाठी अमोल चव्हाण हे बैलगाडीमध्ये खत घेवून त्यांच्या शेतात जात होते.

तेव्हा संतोष दिगंबर चव्हाण (रा. नानेगाव) यांनी गट क्र 203 मध्ये राजेश आप्पासाहेब चव्हाण यांच्या शेतातून अमोल चव्हाण यांच्या शेताकडे जाण्या येण्याच्या रस्त्यात काट्या टाकल्या होत्या. त्यावेळी अमोल चव्हाण हे संतोष दिगंबर चव्हाण यांना म्हणाले की, तुम्ही काट्या का टाकल्या. त्यावेळी संतोष दिगंबर चव्हाण यांनी शिविगाळ करून मारहाण केली.

त्यांच्या जवळ गुप्ती सारखे हत्यार होते. त्यांनी अमोल चव्हाण यांच्या पोटात व पाठीवर व ईतर ठिकाणी मारहाण केली. त्यांच्या सोबतचे शिवाजी बाळाजी चव्हाण, प्रमोद राजेश्वर चव्हाण यांनी पण मारहाण केली. अमोल चव्हाण यांच्या खिशातील 10,300 रुपये काढून घेतले. त्यानंतर बैलगाडीतील 4 खताच्या गोण्या, सल्फरच्या 4 गोण्या, सोयाबीनच्या 3 गोण्या काढून घेतल्या. त्यांच्यासोबत इतर 3 लोक होते. दरम्यान, हा सर्व प्रकार गावातील काही लोकांनी पाहिला व त्यांनी सोडवासोडव केली.

याप्रकरणी अमोल राधाकिसन चव्हाण (वय 32 वर्ष व्यवसाय शेती रा. नानेगाव ता. बदनापूर जि. जालना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संतोष दिगंबर चव्हाण, शिवाजी बाळाजी चव्हाण, प्रमोद राजेश्वर चव्हाण यांच्यावर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!