महाराष्ट्रसिल्लोड
Trending

जालना, भोकरदनच्या ३ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ! सिल्लोड भराडी मार्गावर जिनिंगच्या कॅशियरचे लांबवले होते २० लाख !!

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – पोलीस ठाणे सिल्लोड शहर हद्यीत जबरी चोरी करणाऱ्या ३ चोरटयांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. जालना जिल्ह्यातील या चोरट्यांना पुढील तपासासाठी सिल्लोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. सिल्लोड भराडी मार्गावर २० लाख रुपये चोरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

१) परमेश्वर भीमराव अंभोरे (वय २८ वर्ष रा. चंदनझिरा, जालना), (२) कृष्णा आण्णा हिवाळे (रा. निपाणी चिंचोला ता. भोकरदन जि. जालना), (३) आकाश फुलचंद पिंपळे (रा. सुंदरनगर, जालना) अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक २७/०३/२०२३ रोजी फिर्यादी गोविंद रामजीलाल तायल (वय ५४ वर्ष व्यवसाय- कॅशियर (नविन कोटेक्स जिनींग भराड़ी रोड सिल्लोड) रा. मौलाना आझाद मार्ग त्रिवेणी चौक सेंदवा, जि. बडवानी राज्य मध्यप्रदेश हल्ली मुक्काम नविन कोटेक्स जिनींग भराडी रोड सिल्लोड जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली की, दिनांक २७/०३/२०२३ रोजी ११:५० वाजेच्या सुमारास संत एकनाथ शाळे समोरील सिल्लोड ते भराडी जाणारे रोडवर पाठीमागून डाव्या बाजुला अनोळखी मोटार सायकलवर येऊन तिघांनी हाताला जबरी झटका देवून हातातील रोख रुपयांचे २०,०००,००/- (वीस लाख) रुपयांचे बंडल चोरून नेले. या आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे सिल्लोड शहर येथे गुन्हा दाखल झालेला आहे.

सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक व तांत्रीक विश्लेषणाआधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा चंदनझिरा, जालना येथील रहिवाशी असलेल्या परमेश्वर भीमराव अंभोरे याने त्याच्या इतर साथीदारांमार्फत केला आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (१) परमेश्वर भीमराव अंभोरे (वय २८ वर्ष रा. चंदनझिरा, जालना) याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.

त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार (२) कृष्णा आण्णा हिवाळे (रा. निपाणी चिंचोला ता. भोकरदन जि. जालना), (३) आकाश फुलचंद पिंपळे (रा. सुंदरनगर, जालना) व इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती दिली. या माहितीवरुन त्याचे उर्वरित साथीदारांचा शोध घेतला असता (२) कृष्णा आण्णा हिवाळे (वय २२ वर्षे रा. निपाणी चिंचोला ता. भोकरदन जि. जालना), (३) आकाश फुलचंद पिंपळे (वय २४ वर्षे रा. सुंदरनगर, जालना शहर) हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.

विचारपुस केली असता त्यांनी हा गुन्हा करताना त्यांनी परमेश्वर अंभोरे व त्यांचे इतर दोन साथीदारांना मदत केल्याचे सांगितले. आरोपींकडे गुन्हयातील जबरीने चोरलेल्या पैशांबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरची रक्कम ही त्यांचे इतर दोन फरार साथीदारांकडे असल्याचे सांगितले. त्यावरून उर्वरित दोन्ही आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत आहेत. आरोपीतांना सदर गुन्हयाच्या पुढील तपासकामी पोलीस ठाणे सिल्लोड शहर यांचे ताब्यात देण्यांत आले असून पुढील तपास पोलीस ठाणे सिल्लोड शहर करीत आहे.

ही कामगिरी मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि विजय जाधव, प्रदीप दूबे, सफौ बालू पाथ्रीकर, पोह लहू थोटे, संतोष पाटील, दिपेश नागझरे पोना गणेश गांगवे, नरेंद्र खंदारे, विजय धुमाळ, पोकों ज्ञानेश्वर मेटे, राहूल गायकवाड, आनंद घाटेश्वर, अनिल काळे, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!