महाराष्ट्र
Trending

जालन्यातील व्यापाऱ्याला भरदिवसा १४ लाख ७० हजारांना लुटणारे दोन चोरटे जेरबंद ! चोरीच्या मोटारसायकलवरून धूम स्टाईल लांबवली होती पैशांची पिशवी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – दिवसाढवळ्या जालन्यातील व्यापाऱ्याची 14,70,000/- रुपयांची बॅग हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना 24 तासांत जेरबंद करण्यात आले. जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. चोरीच्या मोटारसायकलवरून धूम स्टाईल चोरी झाल्याने जालन्यातील व्यापारी वर्गांत भीती पसरली होती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्परतेने या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने व्यापारी वर्गांतून पोलिसांचे कौतुक होत आहे.

सुदाम विक्रम जाधव (वय 24 वर्षे रा. सुलतानपूर ता. नेवासा जि. अहमदनगर) व विठ्ठल भिमराव अंभोरे (वय 23 वर्ष रा. सुंदरनगर चंदनझिरा जालना) अशी आरोपींची नावे आहेत. योगेश राजेंद्र मालोदे (वय 38 वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी, रा. कन्हैयानगर जालना) यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे चंदनझिरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडील 14,70,000/- रुपये असलेली पिशवी हिसकावून नेली होती. त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण परिक्षेत्र औरंगाबाद, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचीन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली होती.

पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सूचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. पथकातील अधिकारी / अमलदार हे गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असतांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी 1) सुदाम विक्रम जाधव वय 24 वर्ष रा. सुलतानपूर ता. नेवासा जि. अहमदनगर याने त्याच्या साथीदारासह केला आहे.

मिळालेल्या या गुप्त माहितीवरून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सुलतानपूर ता. नेवासा जि.अहमदनगर येथे जावून सुदाम विक्रम जाधव या आरोपीचा शोध घेतला. त्यास ताब्यात घेवून 24 तासांच्या आत गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपीस गुन्हयासंबधाने विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार 2) विठ्ठल भिमराव अंभोरे (वय 23 वर्ष रा. सुंदरनगर चंदनझिरा जालना) याच्यासह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीने गुन्हयात वापरलेली मोटारसायकलसुध्दा अहमदनगर शहरातून चोरी केलेली असून त्याअनुषंगाने पोलीस ठाणे MIDC अहमदनगर येथे गुन्हा दाखल झालेला आहे.

आरोपी सुदाम विक्रम जाधव व विठ्ठल भीमराव अंभोरे असे दोघांनी दिनांक 10/07/2023 रोजी जालना शहरातील वरकड हॉस्पिटल जवळून सचीन शिवाजी गुडा रा. लक्ष्मीमाता मंदीराजवळ लोधी मोहल्ला जालना यांचेकडील 1,46,000 रुपये असेलेली बॅग हिसकावून नेली असल्याचे कबूल केले आहे. दोन्ही आरोपींच्या ताब्यातुन पो.स्टे. चंदनझिरा मधील एकूण रोख (13,30,000/-रु) व गुरनं 262/2023 मधील रोख (125000/-रु) असे एकूण 14,55,000/- रुपये रोख रक्कम व मोटारसायकल चोरीचे एका गुन्हयातील मोटार सायकल गुन्हयात वापरलेले 04 मोबाईल असा एकूण 15,97,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे चंदनझिरा जालना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचीन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ स्थागुशा सपोनि आशिष खांडेकर, पोउपनि प्रमोद बोंडले, पोउपनि राजेंद्र बाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळ कायटे, राम पहरे, भाऊराव गायके, फुलचंद हजारे, विनोद गडधे, रमेश राठोड, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कृष्णा तंगे, दत्ता वाघुंडे, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, सचीन चौधरी, प्रशांत लोखंडे, विजय डिक्कर, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, फुलचंद गव्हाणे, कैलास खाडे, दीपक घुगे, देविदास भोजने, सुधीर वाघमारे, सतीष श्रीवास, इरशाद पटेल, किशोर पुंगळे, अकुर धांडगे, सचीन राऊत, कैलास चेके, योगेश सहाणे, धीरज भोसले, रवी जाधव, भागवत खरात, संजय सोनवणे चालक धम्मपाल सुरडकर, सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!