महाराष्ट्र
Trending

जालना जिल्ह्यात बसवर दगडफेक करून पेटवली, पोलिस तातडीने पोहोचल्याने अनर्थ टळला ! हसनाबाद परिसरातील जवखेडा फाट्यावरील रात्रीच्या घटनेने तणावपूर्ण शांतता !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४-  जालना डेपोच्या बसवर हसनाबाद परिसरातील जवखेडा फाट्यावर दगडफेक करून बस जाळण्याचा प्रयत्न झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोर बसवर दगडफेक करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व अग्निशामक दलाने परिस्थिती आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिस त्या हल्लेखोरांचा शोध घेत आहे. दरम्यान, या बसमध्ये १२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते. कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

जालना डेपोची बस हसनाबाद मार्गे जात असतानाना बसवर काही हल्लेखोरांनी दगडफेक करत ही बस पेटवून देण्याचाही प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी बस चालक व वाहक यांच्या प्रसंगावधानतेने जीवित हानी टळली. दगडफेक करणारे हल्लेखोर हे फरार झाले आहेत. बसवर झालेल्या या दगडफेकीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी आग्निशमक दलास बोलावून घेतले. माहिती मिळताच अग्निशामक दलाचा बंबही घटनास्थळी तातडीने दाखल झा्ला. बसला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने विझवल्याने पुढील आनर्थ टळला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून हल्लेखोरांचा शोध घेतला. मात्र हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, बसच्या समोरील काच फुटली. याशिवाय पाठीमागील दोन-तीन खिडकीच्या काचा फुटल्या.

Back to top button
error: Content is protected !!