महाराष्ट्र
Trending

जालन्यात कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन मुला मुलींच्या अश्लिल कृत्याचा पर्दाफाश ! पाचशे रुपयांत बंद कंपार्टमेंटमध्ये ३० ते ४० मिनिटे चालायचे अश्लिल चाळे !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – जालन्यात कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन मुला मुलींच्या अश्लिल कृत्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. या कॉफी शॉपमध्ये एकूण 6 वेगवेगळ्या पध्दतीची कम्पार्टमेंट करण्यात आलेली होती. एका कंपार्टमेंटसाठी पाचशे रुपयांचा चार्ज आकारला जात होता. या पाचशे रुपयांत बंद कंपार्टमेंटमध्ये ३० ते ४० मिनिटे हे महाविद्यालयीन युवक युवती अश्लिल चाळे/गैरकृत्य करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी जालन्यातील आझाद मैदान परिसरातील Cafe Thinking Cup कॉफी शॉपवर छापा टाकला. कॉफी शॉपच्या नावाखाली गैरकृत्य करण्यास प्रोत्साहन देणा-या दोघांना पोलिसांनी पकडले.

हॉटेलच्या बेडरुमसारखा करू दिला जायचा मुला मुलींना जागेचा वापर – सदर बाजार पोलिसांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की ‘आझाद मैदान संकुलनातील Cate: Thinking Cup या कॉफी शॉप मध्ये महाविद्यालयीन मुला मुलीकडून कॉफी शॉपच्या नावाखाली कंपार्टमेन्ट उपलब्ध केली जाते आणि त्याकरीता खोली मध्ये 500/-रुपये घेऊन जागा उपलब्ध केली जाते. त्या जागेमध्ये मुला मुलींना जागेचा वापर हॉटेलच्या बेडरुमसारखा करु दिला जातो.” अशी माहिती मिळाली. यावरून सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, महिला पोउपनि दीपाली शिंदे, पोहे कॉ रामप्रसाद रंगे पोहे कॉ जगन्नाथ जाधव पोहे कॉ सोमनाथ उबाळे पो.अ. भरत ढाकणे व पो. अं. प्रदिप करतारे यांनी छापा मारण्याचे ठरविले. त्याकरीता सदर ठिकाणी असा प्रकार चालतो का? अशी खात्री करून घेण्यात आली. याबाबत संपूर्ण शहानिशा झाल्यानंतर वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली.

सोफ्यावर एक कपल बसून अश्लिल कृत्य करताना मिळून आले- दिनांक 19.08.2023 रोजी सदर कॅफे मध्ये महाविद्यालयीन मुले, मुली हे कंपार्टमेन्ट मध्ये पडद्याच्या आडोशाने बसून अश्लिल कृत्य करताना मिळून आले. तसेच मागील खोली मध्ये सोफ्यावर एक कपल बसून अश्लिल कृत्य करताना मिळून आले. काऊंटरवर उपस्थित असलेले आकाश नारायण मोरे (वय 27 वर्ष रा. धांडेगाव ता. जि. जालना) व आशिष विष्णू आंबडकर (वय 23 वर्षे रा. भेलपुरी खु ता. जि. जालना) हे दोघे बसलेले मिळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता येणा-या जोडप्याची कोणताही प्रकारची माहिती किंवा नोंद त्यांच्याकडे असलेल्या रजिस्टर मध्ये करत नव्हते. त्यांच्याकडे सदर जागेबाबत कॅफे चालविण्याच्या तसेच आतील भागामध्ये केलेल्या बदलाबाबत संबंधित विभागाची परवानगी नसल्याचे सांगितले.

कंपार्टमेंटमध्ये लाकूड व कापडयाच्या पडद्याव्दारे आडोसा- कॅफेची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण 06 वेगवेगळ्या पध्दतीची कम्पार्टमेंट करण्यात आलेली होती. या कंम्पार्टमेंटची पाहणी केली असता त्यामध्ये लाकूड व कापडयाच्या पडद्याव्दारे आडोसा तयार करण्यात आलेले होते. पोलिसांनी बोगस जोडप्या मार्फत पाठविलेल्या 500 रुपयाची नोट त्यांचे काऊंटर मध्ये मिळून आल्याने पोलिसांची खात्री झाली की, कॉफी सेंटरच्या नावाखाली त्याठिकाणी गैरकृत्य करण्यासाठी छोट्या कंम्पार्टमेंन्ट 30-40 मिनीटाचे कालावधीसाठी उपलब्ध होत होत्या. त्याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आलेला आहे. याबाबत PITA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत महाजन महिला पोउपनि दीपाली शिंदे, पो.हे.का. रामप्रसाद रंगे पो.हे.का. जगन्नाथ जाधव पो. हे कॉ. सोमनाथ उबाळे पो.अ. भरत ढाकणे व पो. अं. प्रदिप करतारे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!