महाराष्ट्र
Trending

जालन्याच्या सिद्धीविनायक स्टील कंपनीत मजुराच्या अंगावरून हायड्रा क्रेन गेल्याने दोन्ही पाय, कंबर व मांडीला गंभीर दुखापत !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२- जालन्याच्या सिध्दीविनायक स्टील कंपनीत मजुराच्या अंगावरून हायड्रा क्रेन गेल्याने दोन्ही पाय, कंबर व मांडीला गंभीर दुखापत झाली. हायड्रा क्रेन चालकाने भरधाव, निष्काळजी व हलगर्जीपनाने चालवून अंगावर घातल्याचे जखमीने फिर्यादीत नमूद केले आहे.

सचिन भारती दुर्गेश भारती (वय 21 वर्ष व्यवसाय मजूरी रा. गेवरीया पो. बाबळी ता देवरीया जि देवरीया उत्तर प्रदेश) असे जखमी मजुराचे नाव आहे. कडू बाबा पठाण असे आरोपी हायड्रा क्रेन चालकाचे नाव आहे.

ओम हॉस्पिटल जालना येथील आयसीयू वार्डात उपचार सुरु असताना सचिन भारती दुर्गेश भारती याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, तो दोन महिन्यांपासून सिध्दीविनायक स्टील कंपनीमध्ये मजूरी करतो. दि.16.09.2023 रोजी सचिन भारती दुर्गेश भारती नेहमीप्रमाणे सकाळी 08.00 वाजेच्या सुमारास ड्यूटीसाठी आला होता.

एक्सपंशन एरीया भागात सचिन भारती दुर्गेश भारती काम करीत असताना सायंकाळी 05.45 वाजेच्या सुमारास कंपनीतील हायड्रा क्रेन चालक कडू बाबा पठाण याने त्याच्या ताब्यातील हायड्रा क्रेन हे भरधाव, निष्काळजी व हलगर्जीपनाने चालवून सचिन भारती दुर्गेश भारती  याला समोरील बाजूने जोरात धक्का दिला. त्यामूळे सचिन भारती दुर्गेश भारती खाली पडला.

याचदरम्यान चालकाने पून्हा हायड्रा निष्काळजीपणाने चालवून अंगावर चंढवला. यात सचिन भारती दुर्गेश भारती याचे दोन्ही पाय कंबर मांडीला गंभीर मार लागला. कंपनीच्या लोकांनी जखमी अवस्थेत सचिन भारती दुर्गेश भारती यास ओम हॉस्पिटल जालना येथे दाखल केले. उजवे पायाचे डॉक्टरांनी ऑपरेशन केले.

याप्रकरणी सचिन भारती दुर्गेश भारती (वय 21 वर्ष व्यवसाय मजूरी रा. गेवरीया पो. बाबळी ता देवरीया जि देवरीया उत्तर प्रदेश) याने दिलेल्या फिर्यादीवरून कडू बाबा पठाण या हायड्रा क्रेन चालकावर चंदनझिरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!