जालन्याचे SP डॉ. अक्षय शिंदे यांची नागपूरला बदली ! तुषार जोशी आता जालन्याचे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक !!
मुंबई, दि. २४- जालन्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पुणे येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक तुषार जोशी हे ज्वाईन होणार आहेत. राज्य शासनाने आज सायंकाळी याबाबतचे आदेश निर्गमित केले.
शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी भा.पो.से. अधिकार्यांच्या बदलीसंदर्भातील शासन आदेश आज, २४ मे रोजी जारी केला. या आदेशात नमूद केले आहे की, महाराष्ट्र पोलीस अधिधनयम (1951 चा 22) याच्या कलम 22न मधील तरतुदींनुसार भा.पो.से. अधिकार्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.
या आदेशानुसार जालना येथील पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांची नागपूर लोहमार्गच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पुणे येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक तुषार जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
याशिवाय नांदेड नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची बदली पुणे दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.
पोलीस महासांचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी मा.केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण/न्यायालय यांचे आदेश, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था आदी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी, असेही शासन आदेशात नमूद केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe