छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी महोत्सव, 40 कंपन्यामधील 700 जागांसाठी मुलाखती !

- राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान, मॅनयुनायटेड यांच्या सहकार्याने आयोजन

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान व मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेगा जॉब फेअर ऑगस्ट २०२४’ येत्या बुधवारी (दि.सात) विद्यापीठातील नाट्यगृहात (ऑडिटोरिअम) करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ गिरीश काळे यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील नामांकित कंपन्या या जॉब फेअरमध्ये सहभागी होणार असून विविध पदविका, पदवी तसेच पद्व्योत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता या जॉब फेअर मध्ये नौकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या जॉब फेअरमध्ये आय. टी. व नॉन आय. टी. अशा दोन्ही शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रामुख्याने एम.सी. टॅलेंट हंट या मान्यताप्राप्त रिकृटमेंट कंपनीद्वारे असेंटर, विप्रो, डब्ल्यूएनएस, केपीआयटी (Accenture, Wipro, WNS, KPIT) तसेच छत्रपती संभाजीनगर येथील ऋचा इंजिनिअर्स, यशश्री प्रेस, धूत ट्रान्समिशन, धूत ऑटोमोटिव, बी.जी. ली इन, त्रिनेत्री क्वांटम, संजय टेक्नॉप्रोडक्ट, इको सेन्स प्रा. ली., आय.सी.आय.सी आय, ॲक्सिस, एच. डी.एफ.सी. इ. बँक मॅनयुनायटेड, ऍक्सिस बँक आदींसह ऐकून चाळीस कंपन्या सहभागी होणार आहेत.

४० कंपन्यामधील ७०० जागांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून नाव नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मुलाखती घेतल्या जातील. या संदर्भातली कंपन्यांची व रिक्त पदांची सर्व माहिती विद्यापीठाच्या वेब साईट वरील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या लिंक देण्यात अली आहे. विद्यार्थ्यांनी बुधवारी नाट्यगृहात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. गिरीश काळे, ‘नायलेट’चे श्री. के. लक्ष्मण व ‘मॅनयुनायटेड कोर्पोरेट’चे रवींद्र कंगराळकर यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!