छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

नोकरी महोत्सवात 740 विद्यार्थ्यांना नोकरी, 35 कंपन्यांसाठी मुलाखती, 2100 जणांची हजेरी !!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मेगा जॉब फेअर

छत्रपती संभाजीनगर, दि. ७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मेगा जॉब फेअर मध्ये एकाच दिवशी ७४० जणांना नोकरी मिळाली आहे. पुणे व छत्रपती संभाजी नगरातील ३५ कंपन्यांसाठी ही भरती करण्यात आली .

विद्यापीठातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान व मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेगा जॉब फेअर ऑगस्ट २०२४’ बुधवारी (दि.सात) विद्यापीठातील नाट्यगृहात आयोजित करण्यात आला. कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती मोहीम राबविण्यात आली मेगा जॉब फेअरच्या उदघाटनप्रसंगी प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, नायलेटचे कार्यकारी निर्देशक डॉ. जयराज किडव , ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. गिरीश काळे, नायलेट मधील मॉडेल करिअर सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. लक्ष्मण कोरा, डॉ. योगेश शेजवळ तसेच मॅनयुनायटेडचे रवींद्र कंगराळकर, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी डॉ.कैलास पाथ्रीकर हे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी विद्यार्थ्यांना कसे कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे व आपल्या करिअरची सुरवात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. तर नवनवीन कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम कोणकोणते आहेत, विद्यापीठातील नायलेट या केंद्रीय संस्थेमधील मॉडेल करिअर सेंटर कसे काम करते याबद्दल डॉ. जयराज किडव यांनी माहिती दिली.

छत्रपती संभाजी नगर आणि पुणे – मुंबई येथील ३५ नामांकित कंपन्या या जॉब फेअर मध्ये सहभागी झाल्या असून विविध पदविका, पदवी तसेच पद्व्योत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या जॉब फेअर मध्ये नौकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. ट्रेनी, एगझिकेटीव, ई. पी. पी. अंतर्गत ट्रेनी, कस्टमर रिलेशन अधिकारी, तसेच आय. टी. चे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखती घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

४ हजार १० मुलांनी ऑनलाईन नावनोंदणी केली होती. त्यातील २ हजार १००मुले जॉब फेअर ला उपस्थित होती, त्यापैकी ७४० मुलांचीया कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली. यामध्ये ३ ५० हे आयटी पदी जर असून उर्वरित ३९० हे नॉन आयटी शिक्षण घेतलेले पदवीधर होते .मेगा जॉब फेअरचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नायलेटचे योगेश शेजवळ, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे सोहेल शेख तसेच शिल्पा जिरे यांनी परिश्रम घेतले.

Back to top button
error: Content is protected !!