छत्रपती संभाजीनगर
Trending

चितेगावातील घरात विवाहितेला दोन दिवस डांबून ठेवले, बीड बायपासला एका श्रीमंत म्हाताऱ्यासोबत बळजबरीने लग्न लावण्यासाठी नेले, पहा पुढे काय झाले ?

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ – पतीसोबत किरकोळ वाद झाल्याने सदर विवाहिता गल्लीतील एका बाईकडे गेली. त्या बाईने तिला चितेगाव येथे नेले. नंतर तिथे त्या बाईची आई व तिचा मित्र पोहोचले. तिघांनी प्लॅन बनवला की या विवाहितेचे एका श्रमंत माणसासोबत लग्न लाऊन द्यायचे. यासाठी त्या विवाहितेला मारहाण केली. दोन दिवस डांबून ठेवले. मात्र, सदर विवाहितेने समय सुचकता दाखवून पतीला कॉल केला आणि नंतर फिल्मीस्टाईल सुटका झाली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोगेश्वरी (ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) येथील विवाहितेने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, गल्लीतील एका ओळखीच्या बाईकडे विवाहितेचे घरी येणे जाणे आहे. दिनांक 22/05/2023 रोजी दुपारी 3.00 वाजेच्या सुमारास विवाहितेचे व पतीमध्ये घरगुती कारणावरुन किरकोळ वाद झाला होता. म्हणून विवाहिता शेजारी गल्लीत राहणारी बाईच्या घरी गेली होती. विवाहिता त्या बाईच्या घरी रात्रभर राहिली. दिनांक 23/05/2023 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ती बाई विवाहितेला म्हणाली की, तुझा पती तुला घरात घेणार नाही. आपण घरी राहिल्यावर बोर होऊ, मी तुला माझ्या मैत्रीणीकडे चितेगावला घेवून जाते. त्यानंतर त्या बाईने विवाहितेला रिक्षाने चितेगावला घेवून गेली.

चितेगांवला 11.00 वाजे दरम्यान पोहचल्या. चितेगावला एका घराजवळ गेल्यावर त्या बाईने कुलुप उघडले व दोघी घरात गेल्या. पाठीमागुन 15 ते 20 मिनिटाने त्या बाईची आई व तिचा मित्र शाहरुख सय्यद तेथे आले. त्यामुळे विवाहितेला संशय आला आणि तिने सायंकाळी 4.00 वाजेच्या सुमारास जोगेश्वरी येथे नेऊन सोडणेबाबत विनंती केली. परंतु ते लोक विवाहितेचे काहीएक ऐकत नव्हते ते म्हणायचे की, तुला आता येथेच राहायचे आहे. यास विवाहितेने नकार दिल्यावर मारण्याच्या धमक्या त्यांनी दिल्या.

रात्रीच्या सुमारास विवाहितेने जोगेश्वरीतील घरी सोडण्याची त्यांना विनंती केली असता ते म्हणाले की, तुला आता आम्ही घरी जाऊ देणार नाही. तुझे आम्ही एका श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न लावून देणार आहे. तो तुला सुखात ठेवेल असे म्हणत होते. विवाहितेने त्यास विरोध केला मात्र ते तिला धमकावत होते. त्यांनी विवाहितेला घराबाहेर जाऊ दिले नाही. घरातच दोन दिवस डांबून ठेवले. नंतर विवाहितेला कोणतीही माहिती न देता एक रिक्षाने बीड बायपास रोडच्या बाजुला थोड्या अंतरावर असलेल्या दोन मजली बिल्डींग मधील एका रुमवर घेवून गेले.

त्या रुममध्ये एक वयस्कर माणूस होता. तुला या माणसासोबत लग्न करायचे आहे, असे तिघांनी त्या विवाहितेला सुनावले. माझे लग्न झाले असून मला लग्न करायचे नाही, असे विवाहितेने म्हणताच तिला रिक्षात बसून नेणारे तिघे म्हणाले की, तुला लग्न करावेच लागेल तुला या शिवाय पर्याय नाही. तो रुम मधील माणुस त्यांना म्हणत होता की, ही पोरगी लग्न करायची नाही म्हणती एखादी दुसरी मुलगी आणा असे म्हणत होता. यावर त्या तिघांनी विवाहितेला दमदाटी करुन लग्न करण्याचा आग्रह करित होते.

विवाहिता लग्नास नकार देत होती. त्यानंतर विवाहितेला परत रिक्षात बसवून चितेगाव येथे त्याच घरात घेवून गेले. चितेगावला नेल्यावर त्या तिघांनी घरात हाताचापटाने मारहाण केली. एक रात्रभर रुममध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिघे जण घराच्या बाजुला गेल्याची संधी साधत विवाहिता त्यांची नजर चुकवून घराच्या बाहेर आली. रिक्षाने घरी येत असताना त्या तिघांनी विवाहितेला कांचनवाडी येथे पकडले. विवाहितेला रिक्षात बसवून बळजबरीने घाणेगाव येथे घेवून गेले.

घाणेगाव येथे स्मशान भूमीजवळ नेले तेथे ते तिघे रिक्षातून उतरले. त्यावेळी विवाहिता सुध्दा रिक्षातून उतरून रोडने जाणाऱ्या एका माणसाकडे पळत जावून त्यांच्या मोबाईलवरून पतीच्या मोबाईलवर कॉल केला. पतीने तातडीने घटनास्थळ गाठून तिघांच्या तावडीतून तिची सुटका केली. याप्रकरणी विवाहितेने एमआईडीसी वाळूज पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून शाहरुख सय्यद व दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!