खुलताबादछत्रपती संभाजीनगर
Trending

तलाठी व एजंट लाचेच्या सापळ्यात, वाळूचे ट्रॅक्टर सुरु ठेवण्यासाठी घेतले १० हजार !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ – वाळूचे ट्रक्टर सुरु ठेवण्यासाठी एजंटाच्या माध्यमातून १० हजारांची लाच घेताना महिला तलाठ्यासह एजंट सापळ्यात अडकले. दोघांवर खुलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

1. सायली राजेंद्र विटेकर (वय 31 वर्ष, पद- तलाठी वर्ग -3 रा. सिडको N/8 छत्रपती संभाजीनगर), 2. सुधाकर नलावडे (खाजगी व्यक्ती रा.शेखपूर ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांना दोन ट्रॅक्टरने अवैधरीत्या वाळूची वाहतूक करू देण्यासाठी प्रत्येकी एका ट्रॅक्टरच्या 5000 रूपये हप्ता प्रमाणे दोन ट्रॅक्टर्सचे एकूण 10000 रुपये पंचासमक्ष तलाठी सायली विटेकर यांनी लाचेची मागणी करून खाजगी व्यक्ती सुधाकर नलावडे यांच्या मार्फतीने 10,000 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन खुलताबाद येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, विशाल खांबे, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी व तपास अधिकारी – किरण बिडवे पोलीस उप अधीक्षक ए.सी.बी. जालना युनिट, पोलीस कर्मचारी – जमदाडे, घायवत, पोशी देठे, बुजाडे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!