महाराष्ट्र
Trending

पंचायत समितीतून मंजूर गाय गोठ्याच्या बिलाच्या कार्यवाहीसाठी २ हजार मागितले ! बीड जिल्ह्यातील लिंबागणेशचा कनिष्ठ सहाय्यक अडकला सापळ्यात !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – पंचायत समितीतून मंजूर झालेल्या गाय गोठ्याचे बिल मंजुरीची कार्यवाही तपासण्यासाठी २ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील लिंबागणेशचा कनिष्ठ सहाय्यक अलगद जाळ्यात अडकला. याप्रकरणी पोलीस ठाणे बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. गोवर्धन उत्तमराव मुळे (वय -37 वर्षे, व्यवसाय नोकरी, कनिष्ठ सहाय्यक, वर्ग -3, पंचायत विभाग, जिल्हा परिषद बीड रा.लिंबागणेश ता. जि.बीड) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती गेवराई येथून गाय गोठा मंजूर झाला होता. सदर मंजूर झालेल्या गाय गोठ्याचे काम तक्रारदार यांनी पूर्ण करून सदरचे बिल मंजुरी करिता पंचायत समिती गेवराई येथे सादर केले होते. सदरच्या बिलावर स्कुटणी होऊन सदर गाय गोठ्याचे कुशल बिलाची रक्कम 57114/- ची निधीची मागणी करण्यासाठी जिल्हा परिषद बीड येथील पंचायत समिती विभागात प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

सदरच्या पाठवण्यात आलेल्या बिलाच्या प्रस्तावावर काय कार्यवाही झाली हे पाहण्यासाठी तक्रारदार यातील आरोपी गोवर्धन मुळे यांना जाऊन भेटले. आरोपी गोवर्धन मुळे याने सदरील प्रस्तावित बिलावर नागपूर येथून निधीची मागणी करण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे 2000/- रुपयांच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली. लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम 2000/- रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.आरोपी गोवर्धन मुळे यास ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, प्रभारी अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि .बीड, पर्यवेक्षण अधिकारी – शंकर शिंदे, पोलिस उप अधीक्षक, सापळा पथक -अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, भरत गारदे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!