कन्नडछत्रपती संभाजीनगर
Trending

कन्नडच्या बाबा आटोमोबाईल्सने दुचाकीला दिला जालन्याच्या कारचा नंबर ! पडेगावचा दुचाकीस्वार बाबा पेट्रोल पंपाजवळ पोलिसांच्या जाळ्यात !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – जालना येथील कारचा नंबर दुचाकीवर टाकून बिनधास्त फिरणारा दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सन 2007 मध्ये कन्नड येथील बाबा आटोमोबाईल्स कन्नड या शोरुममधून खरेदी केलेली असून हा क्रमांक देखील शोरुम मालकाने दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तो नंबर डिव्हाईसवर तपासला असता तो नंबर जालना येथील एका कारचा असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली.

याप्रकरणी बाबा आटोमोबाईल्स कन्नड या शोरुमचे मालक व वैभव संभाजीराव सरोदे (वय 30 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, मुळ रा. प्लॉट नं. 36, शरद पवार कॉलनी, कन्नड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद, ह.मु. रामगोपाल नगर, पडेगांव, औरंगाबाद) यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलिस नाईक जयश्री खोगरे (नेमणुक वाहतूक शाखा, छावणी, औरंगाबाद शहर) यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 10/12/2022 रोजी त्यांची 09.00 ते 21.00 वाजे पर्यंत बाबा पेट्रोलपंपा समोर पोना सय्यद यांचेसोबत ड्युटी होती. तसेच त्यांच्या सोबत धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे मपोशि कोळी, आशियाना हॉटेल येथे पोना नागरगोजे कर्तव्य बजावत होते. 18.00 वाजेच्या सुमारास पोउपनि बहिरव यांनी समक्ष हजर येऊन सर्वांना संशईत वाहाने चेक करण्याचे आदेशित केले.

दिनांक 10/12/2022 रोजी सायंकाळी 18.20 वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोलपंप पोलीस चौकी समोर औरंगाबाद रोडवर दुचाकी, चारचाकी वाहने चेक करत असताना महिला पोलिस नाईक जयश्री खोगरे यांना समोर नंबर प्लेट नसलेली लाल रंगाची हिरोहोंडा सुपर स्प्लेंडर मोटार सायकल संशयित वाटल्याने त्याला थांबण्यास सांगितले. त्यावरुन त्याने मोटारसायकल थांबवली. मोटारसायकलच्या पाठीमागे MH-20-BN-2012 असा अस्पष्ट नंबर दिसला. मोटार सायकलवरील व्यक्तीचे नाव वैभव संभाजीराव सरोदे (वय 30 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, मुळ रा. प्लॉट नं. 36, शरद पवार कॉलनी, कन्नड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद, ह.मु. रामगोपाल नगर, पडेगांव, औरंगाबाद) असे सांगितले.

त्यास मोटार सायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कागदपत्र नसल्याचे सांगितले. तसेच त्याने वाहन चालविण्याचा परवाना असल्याचे सांगून तो पोलिसांना दाखवला. मोटार सायकलला समोर नंबर प्लेट नाही व पाठीमागील नंबर प्लेट अस्पष्ट असल्याने पोलिसांनी सदर मोटार सायकलला चलान देण्यास महिला पोलिस नाईक जयश्री खोगरे यांच्याकडील ई-चलान डिव्हाईसवर MH-20-BN-2012 असा क्रमांक टाकून पाहाणी केली असता डिव्हाईसवर सदर क्रमांक हा मारुती रिट्स व्हीडीआय या कारचा असून सदर कारही शेख अब्दुल खुद्दस शेख अमीर (रा. शकुंतला मंगल कार्यालया जवळ, जुना जालना) यांच्या नावावर असल्याचे दिसून आले.

त्यानंतर पोलिसांनी MH-20-BN-2012 या क्रमांकाबाबत चालक वैभव सरोदे यास विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदर मोटार सायकल ही सन 2007 मध्ये कन्नड येथील बाबा आटोमोबाईल्स कन्नड या शोरुममधून खरेदी केलेली असून हा क्रमांक देखील शोरुम मालकाने त्यावेळी आम्हाला दिलेला आहे. सदर मोटार सायकलची खरेदी पावतीची छायांकीत प्रत असल्याचे सांगून त्याने ती पोलिसांना दिली.

त्यावरुन पोलिसांनी पावतीची पाहाणी केली असता मोटार सायकलचा इंजिन नंबरची ई-चलान डिव्हाईसवर खात्री केली. परंतू त्याबाबत काहीएक माहीती दिसून आली नाही. त्यामुळे पोलिसांची पूर्ण खात्री झाली की, बाबा आटोमोबाईल्स कन्नडचे मालक यांनी सदर MH-20-BN-2012 हा कारचा क्रमांक आहे हे माहीत असताना तो मोटार सायकलला जाणीवपूर्वक दिला आणि हा मोटार सायकलचा नंबर नाही हे यातील चालक वैभव संभाजीराव सरोदे (वय 30 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, मुळ रा. प्लॉट नं. 36, शरद पवार कॉलनी, कन्नड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद ह.मु. रामगोपाल नगर, पडेगांव, औरंगाबाद) यास माहिती आहे. दोघांनी संगनमत करून त्याची मोटार सायकल पासिंग न करता कारचा क्रमांक त्याच्या मोटार सायकलला वापरून शासनाची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितली.

Back to top button
error: Content is protected !!