कन्नड सभापतीपदी शिवसेनेचे डॉ. मनोज राठोड तर जयेश बोरसे उपसभापती !
कन्नड बाजार समिती सभापती व उपसभापती बिनविरोध निवड

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. सभापतीपदी शिवसेनेचे डॉ मनोज राठोड तर उपसभापती पदी संजना जाधव गटाचे जयेश बोरसे यांची निवड करण्यात आली.
यावेळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव आदी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला.
सभापती पदासाठी कैलास अकोलकर, डॉ मनोज राठोड, गोकुलसिंग राजपूत यांची नावे चर्चेत होती. मात्र जिल्हा बँकेचे संचालक असलेले डॉ मनोज राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने सभापती पदासाठी त्यांची वर्णी लागली. तर उपसभापतीपदाची माळ जयेश बोरसे यांच्या गळ्यात पडली.
यावेळी संचालक किशोर आबा पवार, कैलास अकोलकर, युवराज चव्हाण, गोकुळसिंग राजपूत, अ. जावेद, साईनाथ आल्हाड, दिलीप बनकर आदी सर्व संचालक उपस्थितीत होते.