कन्नड
Trending

कन्नडच्या टिळक नगरमधील घरफोडी उघडकीस, कन्नडच्याच टिळक नगरमधील चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – कन्नड शहरातील टिळकनगरमध्ये झालेल्या चोरीतील चोरट्याच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. ज्या टिळकनगरमध्ये चोरी झाली त्याच टिळकनगर मधील हा चोरटा असून पोलिसांनी ६२,९००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे..

फिर्यादी वृषभ हरीश्चंद पांडे (रा. टिळक नगर, बालाजी मंदिरा जवळ ता. कन्नड) यांनी पोस्टे कन्नड येथे तक्रार दिली की, दिनांक २८/०५/२०२३ रोजी रात्री २२:३० ते दिनांक २९/०५/२०२३ रोजी सकाळी ०६:४५ वाजे दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहते घरातून कपाटाच्या लॉकरमधून सोन्याच्या चार तोळ्याच्या बांगड्या व रोख नगदी रुपये १,८३,०००/- रुपयांचा मुद्देमाल लबाडीच्या इराद्याने चोरून नेला आहे. या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन कन्नड शहर येथे गुरनं १२४ / २०२३ कलम ४५७, ३८० भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रिक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा शोएब शेख सलीम (रा. टिळक नगर, कन्नड) याने केली आहे. त्यावरून त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव शोएब शेख सलीम (वय २२ वर्ष रा. लष्कर, टिळक नगर, कन्नड, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.

त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्हयातील चोरी केलेल्या पैशांपैकी ६२,९००/- रुपये रोख रक्कम काढून दिले. सदरची रक्कम जप्त करण्यात आली. नमुद आरोपीस सदर गुन्हयाच्या पुढील तपासकामी पोलीस ठाणे कन्नड शहर यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे कन्नड शहर करीत आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि विजय जाधव, सफौ बालू पाथ्रीकर, पोह दीपेश नागझरे पोना गणेश गांगवे, पोकों संजय तांदळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!