अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा वेतनश्रेणीच्या दर्जासाठी २० फेब्रुवारीपासून संपाचा एल्गार ! वैजापूर तालुक्यात काळ्या फिती लावून काम करणार !!
- अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचार्यांचा दर्जा व वेतनश्रेणी मिळावी अशी भूमीका संभाजीनगर लाईव्हची आहे. यासंदर्भात अंगणवाडी सेविकांच्या संघटनांच्या पदाधीकारी आणि अंगणवाडी सेविकांनी parth.jagdale@gmail.com या ईमेलवर त्यांची प्रतिक्रिया भूमीका पाठवावी. त्यास योग्य ती प्रसिद्धी देण्यात येईल.
संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – अंगणवाडी सेविका यांना पूर्व प्राथमिक शिक्षक दर्जा देण्यात यावा, अंगणवाडी सेविका यांना वेतनश्रेणी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून राज्यात संपाची हाक देण्यात आली आहे. राज्य सरकारकडे सातत्त्याने पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. याच दरम्यान वैजापूर तालुक्यातही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक अंगणवाडी शिक्षक भारतीच्या वतीने वैजापूरचे प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडीमध्ये काळ्या फिती लावून काम करणार आहेत. वैजापूर तालुक्यातील बोरसर, पालखेड, गाढेपिंपळगाव, लाडगाव, महालगाव या बिटामध्ये काळ्या फिती लावून काम करणार आहे.
२० फेब्रुवारी २०२३ पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी संप पुकारलेला आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या मार्गदर्शनाखाली या संप कालावधीत अंगणवाडीमध्ये काळ्या फिती लावून काम करणार आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अंगणवाडीमध्ये ३-६ वयोगटांतील लाभार्थ्यांना गरमागरम ताजा आहार वाटप करून अंगणवाडी बंद करणार आहे व आहार वाटपाची नोंद त्या रजिस्टर मध्ये ठेवणार आहे. संप कालावधीत अंगणवाडी लाभार्थी आहारापासून वंचित राहणार नाही याची काळजी देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस घेणार आहे.
तसेच २० फेब्रुवारी २०२३ पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपकाळातील अहवाल तसेच २० फेब्रुवारी २०२३ नंतर मोबाईल मध्ये कोणतीही ऑनलाईन माहिती भरणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
२० फेब्रुवारी २०२३ नंतरच संप कालावधीत अंगणवाडी सेविका व मदतनीस अंगणवाडीमध्ये काळ्या फिती लावून काम करणार असल्याने त्यांचे मानधन कपात करू नये, अशी विनंतीही वैजापूरचे प्रकल्प अधिकारी यांना करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष माया म्हस्के, सचिव कमल येवले, संघटक अश्विनी सोनवणे, तालुका अध्यक्ष पुष्पा जाधव, संघटक कविता चौधरी, तालुका उपाध्यक्ष आशा हारदे, संघटक मुक्ता मनाळ यांची नावे आहेत.
अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचार्यांचा दर्जा व वेतनश्रेणी मिळावी अशी भूमीका संभाजीनगर लाईव्हची आहे. यासंदर्भात अंगणवाडी सेविकांच्या संघटनांच्या पदाधीकारी आणि अंगणवाडी सेविकांनी parth.jagdale@gmail.com या ईमेलवर त्यांची प्रतिक्रिया भूमीका पाठवावी. त्यास योग्य ती प्रसिद्धी देण्यात येईल. किंवा 9923355999 या व्हाट्स अप क्रमांकावर निवेदन किंवा प्रतिक्रिया पाठवू शकतात.
अंगणवाडीसंदर्भातील खालील बातम्याही वाचा-
आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला !
अंगणवाडी, ग्राम पंचायतीमध्ये ‘सुकन्या समृद्धी योजनेत’ खाते उघडण्यासाठी प्रबोधन !
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe