कन्नडछत्रपती संभाजीनगर
Trending

विवाहाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी पळाली ! कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील युवकाची साडेचार लाखांची फसवणूक !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – सुरुवातील गोड बोलून विवाह ठरवला. आमची पैशे खर्च करण्याची ऐपत नाही. त्यामुळे नवऱ्या मुलाने पैसे दिले. भराडीला विवाह झाला. त्यानंतर वणीच्या देवीचे दर्शनही झाले. तेथून आल्यानंतर सत्यनारायणाची पूजाही झाली. तीन दिवसांनंतर भावाच्या मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमाचा बहाणा करून नवरी मुलगी जी गेली ती परतलीच नाही. वेगवेगळे कारण देऊन नवरी न परतल्याने नवऱ्या मुलाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने पोलिस स्टेशन गाठून घडलेली हकीकत सांगितली. दरम्यान, अशा प्रकार फसवणूक करणारी टोळीच सक्रिय असल्याची माहिती आहे.

कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यातील घाटशेंद्रा येथील युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून नवरीसह ९ जणांवर पिशोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर युवकाला एका मध्यस्थाने मोबाईलमध्ये मुलीचा फोटो दाखविला व सदर युवकाचा फोटो व आधार कार्ड सिल्लोड येथील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठविला. त्यानतंर तीन-चार दिवसांनी एक जण व एक बाई युवकाकडे घाटशेंद्रा येथे आले.

त्या दोघांनी सदर युवकाचे घर पाहिले. आठ दिवसानंतर मुलगी पाहण्यासाठी जायचे ठरले. आठ दिवसानंतर व्हिस्टा गाडी करुन घरुन सकाळी 05.00 वाजता निघून औंढानागनाथ येथे पोहोचलो. तेथे एक जण व त्याच्या सोबत एक बाई भेटली. ते सोबत गाडीत बसले. तेथून सर्वजण दुपारी 12.00 वाजता लोहगाव (ता. जि. हिंगोली) येथे मुलीच्या घरी पोहचले. तेव्हा मुलीचे आईवडील घरी नव्हते. त्याच्या घरी मुलगी तीची आत्या बहिण व आजी होती.

तेथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. तेव्हा मुलीचा नंबर घेतला. मुलगी पाहून सर्वजण हिंगोली येथे आले. हिंगोलीला आल्यावर मुलीचा फोन आला व तिने सांगितले की, मला मुलगा पसंत आहे, पण माझे आईवडील घरी नसल्यामुळे मी काही सांगू शकत नाही, ते आल्यावर तुम्हाला कॉल करतील. त्यानंतर सर्वजण घाटशेंद्रा आले. दरम्यानच्या काळात मुलीने अनेकवेळा फोन कॉल केले. तुम्ही माझ्या आईवडीलांना भेटा असे ती म्हणत होती. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांना भेटण्यासाठी हे सर्व जण पुन्हा लोहगाव (ता. जि. हिंगोली) गेले. तेथे मुलीचे वडील, आई, भाऊ, आत्या भाऊ भेटले. तेंव्हा मुलीचे वडील म्हणाले की, आमची परिस्थिती गरीब आहे, लग्न करण्यसाठी आमच्याकडे पैसे नाही, तुम्हाला लग्नसाठी पैसे द्यावे लागतील. असे म्हणाल्याने तीन लाख रुपये द्यायचे ठरवून लग्न दिनांक 08/03/2023 रोजी मुलाच्या परिसरात करण्याचे ठरले.

भराडी येथे खंडोबाच्या मंदिरात सकाळी 11.00 वाजता विवाह पार पडला. लग्न लागल्यानंतर जेवण्यासाठी सिल्लोड येथील महाराजा हटेल येथे गेले. तेथे जेवन केल्यानंतर 1,75,000/रुपये रोख दिले व उर्वरीत रक्कम नंतर देण्याचे ठरले. दरम्यान, यापूर्वी अनेकवेळा रोख व ऑनलाईन पैसे दिले. त्यांना पैसे दिल्यानंतर ते त्यांच्या गाडीत बसून त्यांच्या गावी गेले व नवरी नवर्यामुलासोबत नांदण्यासाठी घाटशेंद्रा येथे आली. घरी आल्यावर पुन्हा ऑनलाईन पैसे पाठवले. नंतर नव दाम्पत्य दिनांक-11/03/2023 रोजी चिंचोली लिंबाजी येथील स्विफ्ट गाडी करून सातारा (ता. जि. औरंगाबाद) व वणी (जि.नाशिक) येथे देवदर्शनासाठी गेले.

देवदर्शनाहून परतल्यानंतर दुसया दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली. त्यानंतर दोन तीन दिवसांनी सदर मुलीने सांगितले की, माझ्या भावाच्या मुलाचे जावळ आहे. मला त्या कार्यक्रमाला जायचे आहे, असे सांगून ती निघून गेली. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून ती आलीच नाही. हे सर्वजण तिच्या घरी तिला आणायला गेले तेंव्हा त्यांनी यांना धमकावले व मुलीला पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे सदर युवकाच्या लक्षात आले. एकूण साडेचार लाख रुपयांची फसवणूक झाली.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून 1) परमेश्वर पवार 2 ) ज्ञानेश्वर परमेश्वर पवार 3 ) नवरी मुलगी 4 ) रंजीत चव्हाण (सर्व रा. लोहगाव ता. जि. हिंगोली) व एजंट अशा नऊ जणांवर पिशोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!