छत्रपती संभाजीनगर
Trending

करमाड हद्दीत हर्सूलच्या सोनाराच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून लुटणारे बदनापूर तालुक्यात लपून बसलेले तीन चोरटे जेरबंद !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – करमाड हद्दीत हर्सूल येथील सोनाराच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून लुटणारे तीन आरोपींना जालना जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. बदनापूर तालुक्यातील पिरसावंगीत लपून बसल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल असा 1,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१) गज्या उर्फ गजानन परशूराम ढगे वय २५ वर्षे रा. सिरसवाडी ता.जि जालना ह.मू पिरसावंगी ता. बदनापूर जि.जालना २) कृष्णा सुभाष कातूरे वय ३० वर्षे रा. पिरसावंगी ता. बदनापूर जि.जालना ३) विठ्ठल भाऊसाहेब कौचट वय २७ वर्षे रा. सिरसवाडी ता.जि जालना अशी आरोपींची नावे आहेत

फिर्यादी मुरलीधर विठ्ठलराव मैद (वय ५० वर्षे रा. ओमसाईनगर, हर्सूल जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, दिनांक १६/११/२०२३ रोजी १८.०० वाजेच्या सुमारास त्यांची करमाड येथील सराफा दुकान बंद करून छत्रपती संभाजीनगर येथे घरी जात असताना आदर्श स्टील दुकानाच्या समोर रोडवर फिर्यादी हा लघुशंका करण्यासाठी थांबला असता पाठीमागून दोन अनोळखी आले व त्यांनी फिर्यादीच्या डोळयात मिर्ची पुड टाकून मारहाण केली. त्यांच्या पाठीवरील असलेल्या सॅक (बॅग) मधे ठेवलेले चांदीचे १३०० ग्रॅम वजनाचे दागिने किमत ६६,५००/- रुपयांचे बळजबरीने हिसकावून पळून गेले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन करमाड येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक मनिष कलावानिया यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. पो.नि सतीश वाघ यांनी तात्काळ दरोडा व जबरी चोरी पथकासह घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तांत्रिक विश्लेषणा आधारे तसेच गुप्त बातमीदारा मार्फत माहीती घेतली असता सदरचा गुन्हा हा गजानन ढगे (रा. पिरसावंगी ता. बदनापूर जि.जालना) याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह केला असल्याची माहिती मिळाली होती.

संशयित आरोपी हे पिरसावंगी शिवार (ता. बदनापूर जि.जालना) येथील शेतवस्तीवर लपून बसल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिरसावंगी येथील शेतवस्तीवर सापळा लावला. तेथे घराच्या पाठीमागे एका मोकळ्या मैदानाच्या बाजुला संशयित १) गज्या उर्फ गजानन परशूराम ढगे वय २५ वर्षे रा. सिरसवाडी ता.जि जालना ह.मू पिरसावंगी ता. बदनापूर जि.जालना २) कृष्णा सुभाष कातूरे वय ३० वर्षे रा. पिरसावंगी ता. बदनापूर जि.जालना ३) विठ्ठल भाऊसाहेब कौचट वय २७ वर्षे रा. सिरसवाडी ता.जि जालना मिळून आले. पोलिसांनी त्यांना शिताफिने ताब्यात घेतले.

विश्वासात घेवून गुन्हयासंदर्भात विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या कडून गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल असा 1,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस स्टेशन करमाड करत आहे. त्यांच्या कडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कामगीरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पो.उप.नि. भगतसिंग दुलत, पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, दिपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!