भाजपचा २८ वर्षांचा किल्ला ढासळला, कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर कसबा पोटनिवडणुकीत विजयी !
पुणे, दि. २- गेल्या २८ वर्षांपासून असलेल्या भाजपचा किल्ल्याला कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी सुरुंग लावला. कसबा पेठेत महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली. विधानसभेच्या कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. ११ हजार ४० मतांनी त्यांचा विजय झाला.
महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना ७३१९४ तर भाजपाचे हेमंत रासने ६२२४४ मते मिळाली. कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टीळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. या जागेवर भाजपाने टीळक कुटुंबाला तिकीट नाकारल्याने नाराजीचा मोठा सूर दिसून आला. याचा परिणाम भाजपला या पोटनिवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले.
गेल्या २८ वर्षांपासून कसबा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात होता. मात्र, या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने तो दीर्घ कालावधीनंतर भाजपाच्या ताब्यातून मिळवण्यात यश मिळवले आहे. १९९५ नंतर सलग भाजपाने या मतदारसंघावर आपले प्रतिनिधीत्व केले. १९९२ मध्ये पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने येथे विजय मिळवला होता. त्यानंतर १९९५ पासून भाजपाने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला होता. दरम्यान, या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी भाजपच्या या मतदारसंघाला सुरुंग लावला.
भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. टीळ कुटुंबातील व्यक्तीला तिकीट नाकारल्याने भाजपाविरोधात मोठी संतापाची लाट दिसून आली. याचाच फटका भाजपाला बसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही या निवडणुकीत लक्ष घालून बंडखोरी थोपवली. यामुळे कॉंग्रेसचा विजय सुकर झाला. याशिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या सर्वांची एकजूट या निवडणुकीच्या विजयातून दिसून आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe