महानगरपालिका
Trending

हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी करून प्रशासकांनी दिले हे निर्देश ! दररोज १५० मेट्रिक टनाची असेल क्षमता !!

परिसर स्वछ आणि हिरवळ करण्याचे निर्देश

संभाजीनगर लाईव्ह, दि. 29- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महापालिकेच्या हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्राची आज दिनांक 29 मे रोजी पाहणी केली आणि आढावा घेतला.

आज संध्याकाळी चार वाजता प्रशासक जी श्रीकांत यांनी हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्राच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. प्री-सॉरटिंग शेड, प्रोसेसिंग शेड आणि व्हीन्ड्रो कंपोस्टिंग शेड आणि मशिनरीची पाहणी त्यांनी केली आणि माहिती घेतली. 150 मॅट्रिक टन प्रति दिवस क्षमतेच्या हा प्रक्रिया केंद्र होणार असून या ठिकाणी मनुष्यबळ बाबत व लाईट फिटिंग इत्यादी बाबींबाबत त्यांनी विचारणा केली.

यावेळी प्रशासकांनी कचरा प्रक्रिया केंद्र चा परिसरात वृक्षरोपण करून हा परिसर हिरवळ करण्याचे निर्देश दिले आणि तयार झालेल्या शेड्समध्ये साफसफाई करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.

सलीम अली सरोवर परिसराची पाहणी- हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्र याची पाहणी करून परत येताना प्रशासक जी श्रीकांत यांनी सलीम अली सरोवर परिसराची पाहणी केली आणि या ठिकाणी फर्निचर ची दुकान मालकांनी केलेले अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. तसेच तलावाच्या काठ्यावर साचलेला कचरा साफ करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Back to top button
error: Content is protected !!