महाराष्ट्र
Trending

जालना जिल्ह्यात युवा शेतकऱ्याला चाकुने पोटात भोसकले, गंभीर जखमी ! पांदीत नैसर्गिक विधी करण्यावरून वादाची ठिणगी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – घरासमोरील पांदीत नैसर्गिक विधी करण्यास विरोध केला म्हणून अंगणात झोपलेल्या युवा शेतकर्यावर चाकूने हल्ला चढवला. पोटात दोन सपासप वार केल्याने युवा शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मंठा तालुक्यातील अंभोरा शेळके या गावात घडली. सध्या या जखमी शेतकर्यावर जालन्यातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत.

अविनाश अर्जून आघाव (वय 28 वर्षे, धंदा शेती रा. अंभोरा शेळके, ता. मंठा जि.जालना) असे जखमी युवा शेतकर्याचे नाव आहे. त्यांच्यावर ICU विघ्नहर्ता हॉस्पिटल जालना मंठा बायपास रोड जालना येथे उपचार सुरु आहेत. आघाव यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, आम्ही शेतात रोड लगत राहतो. गावातील मुंकुंदा ज्ञानेश्वर शेळके हा अविनाश आघाव यांच्या घराच्या समोर पांदीत नैसर्गिक विधीला बसायचा. घरासमोर पांदीत नैसर्गिक विधीला बसू नको असे सांगितले असता तो धमकी द्यायचा.

दि.18.10,2023 रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास अविनाश वाघ जेवण करून झोपले. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास मुंकुंदा ज्ञानेश्वर शेळके हा घरासमोर येवून मोठ्याने बोलू लागला. यावेळी अविनाश आघाव हे घराच्या बाहेर अंगणात झोपलेले होते. मुकुंदा शेळके यांनी अविनाश आघाव यांच्या पोटात दोन ठिकाणी चाकूने मारून गंभीर जखमी केले. आरडा ओरड केल्याने अविनाश आघाव यांचा भाऊ विकास अर्जून आघाव हा भांडण सोडण्यास आला असता त्यास पण उजव्या हाताच्या दंडास व उजव्या पायाच्या मांडीस मारून जखमी केले नंतर तो पळून गेला.

जखमी अविनाश आघाव यांना नातेवाईकांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल जालना येथे दाखल केले. सध्या अविनाश आघाव यांच्यावर उपचार चालु आहे. जखमी अविनाश आघाव यांनी दिलेल्या जबाबानुसार मुकुंदा शेळके यांच्यावर मंठा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!