छत्रपती संभाजीनगर
Trending

अमीत किशनचंद तलवाणी, गुरुप्रितसिंग लांबा यांच्या दुकानावर छापेमारी ! हुबेहुब नक्कल केलेले कपडे जप्त, कंपनीचे अधिकारी व क्रांतीचौक पोलिसांची संयुक्त कारवाई !!

श्री गुरु एजन्सी, दिवाण देवडी रोड व लांबा स्पोटर्स, निरालाबाजार या दुकानांवर छापेमारी

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – PUMA SE या कंपनीचे ट्रेडमार्क, कॉपी राईट, उल्लघन करुन व हुबेहुब नक्कल केलेले बनावट कपडे जप्त कंपनीचे अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जप्त केले. शहरातील दोन दुकानांवर ही कारवाई करण्यात आली. दोन दुकानांमधून एकूण 2.58,600/- रुपये किमतीचे PUMA कंपनीचे बनावट नाव व लोगे असलेले कपडे जप्त करण्यात आले. श्री गुरु एजन्सी, दिवाण देवडी रोड व लांबा स्पोटर्स, निरालाबाजार या दुकानांतून कपडे जप्त करण्यात आले आहे.

1) अमीत किशनचंद तलवाणी (वय 42 वर्ष, व्यवसाय व्यापार रा. स्कॅय सिटी, एम.आय.टी. कॉलेज जवळ, छत्रपती संभाजीनगर), 2) गुरुप्रितसिंग अवतारसिंग लांबा (वय 27 वर्ष व्यवसाय व्यापर रा.घर नं.5/14/23, लांबा मार्केट, पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये प्राथमिक माहितीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

दिलीपकुमार और स्वर्णकार (वय 38 वर्ष धंदा खा. नौकरी रा. सम्राट अशोक नगर, नवजिवन सोयायटी समोर, आर. सी. मार्ग, राजु टेलर यांचे दुकाणाजवळ, चेंबुर कॉलनी, मुंबई) यांनी क्रांतीचौक पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, RNP IP Attonery IPS या कंपनीमध्ये मागील 10 वर्षांपासून तपासी अधीकारी म्हणून ते कार्यरत आहे. सदर कंपनीचे कार्यालय 401-402 सन सिटी सक्सेस टॉवर, गोल्फ कोर्स एक्सटेशन रोड सेक्टर 65 गुड़गांव राज्य हरियाना या ठिकाणी कंपनी PUMA SE या कंपनीचे ट्रेडमार्क, कॉपी राईट, उल्लघन करुन व बनावट उत्पादन करुन मालाची कोणीही विक्री करीत असल्यास त्याचा शोध घेवून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत असते. कंपनीचे अॅटर्नी श्री कृष्णपाल सिंग यांनी दिलीपकुमार और स्वर्णकार यांना कंपनीचे तर्फे मुखत्यारपत्र (POWER OF ATTORMY) दिले असून कंपनीने PUMA SE या कंपनीच्या उत्पादनाची हुबेहुब नक्कल करून बनवलेली उत्पादने ओळखण्याचे दिलीपकुमार और स्वर्णकार यांना प्रशिक्षण दिले आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे पो.स्टे. क्रांतीचौक हद्दीत श्री गुरु एजन्सी, दिवाण देवडी, तसेच लांबा स्पोटर्स, निरालाबाजार येथे दुकानदार हे PUMA SE या कंपनीचा उत्पादनाचा हुबेहुब नक्कल करून बनवलेली उत्पादने त्या मध्ये कपडे, लोगो, लेबल ही विक्री करण्यासाठी साठा करुन ठेवलेली असल्याची खबर मिळाल्यावरुन दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयास दिलीपकुमार और स्वर्णकार यांनी कंपनी तर्फे तक्रार अर्ज दिलेला आहे. तक्रार अर्जा अनुषंगाने दिनांक 12/05/2023 रोजी पोलीस स्टेशन क्रांतीचौक येथे हजर झाले.

सदर अर्जाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्या आदेशाने पोलीस उप निरिक्षक प्रभाकर सोनवणे व त्यांच्या सोबत पोह नरेंद्र गुजर, पोह मंगेश पवार, पोअं कृष्णा चौधरी, मपोअं पुनम गांवंडे सोबत दोन पंचासह पथक 18.31 वाजता पोलीस स्टेशन क्रांतीचौक येथुन रवाना झाले. प्रथम श्री गुरु एजन्सी, दिवाण देवडी रोड येथे पथक पोहचले. 18.45 वाजता दुकानावर दुकाण मालक अमीत किशनचंद तलवाणी (वय 42 वर्ष, व्यवसाय व्यापार रा. स्कॅय सिटी, एम.आय.टी. कॉलेज जवळ, छत्रपती संभाजीनगर) हजर होते. पथकाने परिचय करून दिला व दुकानाची झडती घेण्याचे सांगितले. दुकानदारांनी झडती घेण्यास नकार दिला. त्यावेळी दिलीपकुमार और स्वर्णकार यांनी ऑथारिटी लेटर दाखविले. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरु झाली.

तपासणी पथक, पंच व पोलीस पथक यांनी दुकानाची पाहणी करून तपासणी केली असता सदर दुकाणात PUMA कंपनीचे लोगो व नाव यांचे छपाई असलेले नक्कल केलेले ट्रॅक पॅन्ट, जॅकेट, आणी टिशर्ट असे प्लॉस्टीकचे पिशवीमध्ये कपडे मिळून आले. त्यावेळी दिलीपकुमार और स्वर्णकार यांनी दुकानदारास PUMA कंपनीचे कापडे विक्री करण्याचा परवान्याची विचारणा करून सदरचे कपडे खरेदी केलेल्या बिलाची विचारणा केली असता त्याने त्याचे परवाना व बीले नाहीत असे सांगितले. एकूण 1,96,200/- रुपये किमतीचा मुद्देमाल हा पोलीसांनी पंचनामा करुन पंचा समक्ष जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

लांबा स्पोटर्स, निरालाबाजार-

त्यानंतर मिळालेल्या माहिती प्रमाणे लांबा स्पोटर्स, निरालाबाजार येथे तपासणी पथक, पंच, पोलीस पथक 21.05 वाजता धडकले. दुकानावर कामगार मुलगा हजर होता. त्याच्याकडे दुकानाच्या मालकाची विचारणा केली असता ते घरी असल्याचे त्याने सांगितले. सदर कामगार मुलाने दुकान मालकाला फोन करून बोलावून घेतले. दुकान मालकांनी त्यांचे नाव गुरुप्रितसिंग अवतारसिंग लांबा (वय 27 वर्ष व्यवसाय व्यापर रा.घर नं.5/14/23, लांबा मार्केट, संभाजीनगर) असे सांगितले. पथकाने परिचय देवून झडतीला सुरुवात केली. सदर दुकानात PUMA कंपनीचे लोगो व नाव यांचे छपाई असलेले नक्कल केलेले टिशर्ट असे प्लॉस्टीकचे पिशवी मध्ये कपडे मिळुन आले. PUMA कंपनीचे कपडे विक्री करण्याचा परवाना व खरेदीची बीले नाहीत असे त्यांनी सांगितले. या दुकानातील मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला.

वरील दोन्ही दुकानांमधून एकूण 2.58,600/- रुपये किमतीचे PUMA कंपनीचे बनावट नाव व लोगे असलेले कपडे जप्त करण्यात आले. याप्रकरणी दिलीपकुमार और स्वर्णकार (वय 38 वर्ष धंदा खा. नौकरी रा. सम्राट अशोक नगर, नवजिवन सोयायटी समोर, आर. सी. मार्ग, राजु टेलर यांचे दुकाणाजवळ, चेंबुर कॉलनी, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीवरून 1) अमीत किशनचंद तलवाणी (वय 42 वर्ष, व्यवसाय व्यापार रा. स्कॅय सिटी, एम.आय.टी. कॉलेज जवळ, छत्रपती संभाजीनगर), 2) गुरुप्रितसिंग अवतारसिंग लांबा (वय 27 वर्ष व्यवसाय व्यापर रा.घर नं.5/14/23, लांबा मार्केट, पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर रामदास सोनवणे हे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!