छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरात हॉटेल खाली करण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी ! लोटाकारंजा परिसरात हॉटेल बॉम्बे ए वन तवा स्पॉटसाठी २२ जण लाठ्या काठ्या घेऊन भिडले !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – हॉटेल खाली करण्याच्या कारणावरून दोन गट लाठ्या काठ्या घेऊन भिडले. यात दोन जण जखमी झाले असून त्यांना घाटीत दाखल करण्यात आले आहे. ही घटना हॉटेल बॉम्बे ए वन तवा स्पॉट, कामाक्ष चौक, लोटाकारंजा रोज, सिटी चौक परिसरात घडली.

1) मोहमंद फेरोज चाँद अली (वय 26 वर्षे, धंदा मजुरी, रा. बॉम्बे ए वन तवा स्पॉट लोटा कारंजा, सिटीचौक छत्रपती संभाजीनगर) हा भाडेकरु इरशाद अहमेद याचे गटाचा व 2) रिझवान शफीक शेख (वय 24 वर्षे व्यवसाय चालक, रा हर्सूल छत्रपती संभाजीनगर) व इतर 20 ते 22 जण अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात सिटी टौक पोलिस स्टेशनचे पोअ मंगेश दगडु यांनी दिलेली माहिती अशी की, दि. 03/03/2023 रोजीच्या 03-00 वाजेच्या सुमारास हॉटेल खाली करण्यासाठी आलेल्या लोकांनी व हॉटेल जागा न सोडणारे अशा दोन्ही गटांनी जमाव जमवून सार्वजनिक रोडवरील हॉटेल बॉम्बे ए वन तवा स्पॉट या हॉटेल व हॉटेल समोर सार्वजनिक रोडवर राडा घातला. एकमेकांना लाकडी दांडे व मिळेल त्यासाधनाने आपसात एकमेकांना हाता चापटाने मारहाण करून दगंल सदृष्य परीस्थीती निर्माण केली.

या मारहाणीमध्ये 1) मोहमंद फेरोज चाँद अली वय 26 वर्ष धंदा मजुरी रा. बॉम्बे ए वन तवा स्पॉट लोटा कारंजा, सिटीचौक हा भाडेकरु इरशाद अहमेद याचे गटाचा व 2) रिझवान शफीक शेख वय 24 वर्षे व्यवसाय चालक रा हर्सूल हे हॉटेल खाली करण्यासाठी आलेल्या गटाचा हे जखमी झाले. त्यांना पोलीस स्टेशन तर्फे मेडिकल मेमो देवून औषध उपचार कामी घाटी दवाखाना येथे पाठवण्यात आले आहे.

बॉम्बे ए वन तवा स्पॉट ही हॉटेल खाली करण्यासाठी रहीम पटले (रा. हर्सूल) व त्याने सोबत आणलेले इतर 10 ते 15 आणी हॉटेल चालक इरशाद अहमद (मुळ रा. उत्तरप्रदेश) हा व त्याचे सोबतचे पाच ते सात लोक यांनी जमाव जमवला. हातात लाठ्या काठ्या घेवून आपसात दगंल करून एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. यात दोघेजण जखमी झाले.

सिटी टौक पोलिस स्टेशनचे पोअ मंगेश दगडु यांच्या फिर्यादीवरून २२ जणांवर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये कलम 143,147, 148,149, 324,323, 427 सह कलम 135 मपोका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि रोहीत गांगुर्डे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!