छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

आधार केंद्रासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना महानगरपालिकेचा कनिष्ठ लिपिक आणि अभियंता जाळ्यात ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील भ्रष्ट्राचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – आधार केंद्रासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना महानगरपालिकेचा कनिष्ठ लिपिक आणि अभियंता जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील भ्रष्ट्राचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब या उक्तीचा तर पदोपदी अनेकांना अनुभव येत आहे. चिरीमीरी घेतल्याशिवाय काही ठरावीक कर्मचारी व अधिकारी कामच करत नसल्याच्या तक्रारी जनतेमधून बोलून दाखवल्या जात आहे.

1) निखिल मूंकूद गायकवाड (वय 29 वर्षे, व्यवसाय नोकरी, पद कनिष्ठ लिपिक वर्ग 3, मालमत्ता विभाग, महानगरपालिका, 2) शेख मोईनुद्दीन शेख नईम (वय 30 वर्षे, व्यवसाय नोकरी, कनिष्ठ अभियंता (कंत्राटी), मालमत्ता विभाग, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांना आधार केंद्रासाठी तात्पूरत्या स्वरुपात महानगरपालिकेची शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी कनिष्ठ लिपिक निखिल मूंकूद गायकवाड यांच्या निर्देशांन्वये कनिष्ठ अभियंता शेख मोईनुद्दीन शेख नईम यांनी पंचासंमक्ष 15,000/- रुपये लाचेची मागणी केली. सदर लाच रक्कम कनिष्ठ लिपिक निखिल मूंकूद गायकवाड यांनी कनिष्ठ अभियंता शेख मोईनुद्दीन शेख नईम यांच्या उपस्थितीत पंचा समक्ष स्वतः स्वीकारली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत.

दिनांक – 28/03/2023 व 31/03/2023 रोजी तक्रारदार यांना लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 06/04/2023 रोजी लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईने पुन्हा एकदा महानगरपालिकेतील भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर आला आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, मारुती पंडित,पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ अधिकारी- दीपाली निकम, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोना भीमराव जिवडे, पोना सुनील पाटील, पो.अ. अशोक नागरगोजे, दत्ता होरकटे, चालक पोशि चंद्रकांत शिंदे , चांगदेव बागुल यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!