महाराष्ट्र
Trending

जालना: नायब तहसीलदाराच्या नाकाखालून वाळूचा ट्रॅक्टर पळवला ! पथकाच्या पाठीमागून दुचाकीस्वार आले अन पलटी झालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली वेगळी करून पसारही झाले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – चोरटी वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचा सुमारे दीड किलोमीटर पाठलाग केला खरा मात्र, पथकाच्या गाडी मागून दुचाकीस्वार आले आणि ट्रॉली वेगळी करून पसार झाले. परिविक्षाधिन नायब तहसिलदार व पथकाच्या नाकाखालून त्यांनी हा ट्रॅक्टर पळवला. दीड किलोमीटर ट्रॅक्टरसारख्या वाहनाला शासकीय गाडीला साधा ओव्हरटेकही करता आला नाही. एव्हडेच नाही तर दीड किलीमीटर सुरु असलेला पाठशिवणीच्या या खेळा दरम्यान शासकीय गाडीच्या पाठीमागून दुचाकीस्वार आले आणि पलटी झालेली ट्राली वेगळी करून पसार झाले. दुचाकीस्वारांनी शासकीय गाडीला ओव्हरटेक करून ट्रॉली वेगळी करेपर्यंत पथकाच्या कार्यतत्परतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील हनुवतखेडा रोडवर (ता. मंठा) घडली.

प्रविण नारायणराव देशमुख (वय 42 वर्षे व्यवसाय- नौकरी परिविक्षाधिन नायब तहसिलदार मंठा ता. मंठा जि.जालना) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, मंठा येथे मागील चार महिन्यांपासून नेमणुकीस आहे. सध्या तहसिल सुट्टीच्या दिवसाची फिरते पथक यामध्ये अवैद्य गौणखनिज उत्खनन व वाहतुक प्रतिबंधक पथकात नायब तहसिलदार प्रविण नारायणराव देशमुख पथकप्रमुख 2 ) रविंद्र विठ्ठलराव पुल्लागोर तलाठी 3) राजेंद्र हरिभाऊ चिंचाणे कोतवाल असे आहे.

दि.05.05.2023. रोजी हे पथक तहसिल कार्यालयासमोर हजर असताना बातमी दारामार्फत बातमी मिळाली की मौजे उस्वद येथील पूर्णा नदिच्या पात्रातील काही लोक ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना चोरटी वाळु काढत आहेत. ही खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन संबंधीत सज्जाचे तलाठी नितिन शेषराव चिंचोले यांच्यासह शासकिय वाहनाने (क्र. MH-21 BH-1279) ठिक 13.00 वाजता निघून मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी 13.30 वाजता महादेव मंदिराच्या पाठीमागील रोडने जात असता हनुवतखेडा रोडवर एक विना नंबरचा ट्रॅक्टर ज्यात अंदाजे एक ब्रास वाळु वाहतुक करित असतांना दिसला.

वैधता तपासणी उद्देशाने पथकाने पाठीमागून त्यास हॉर्न वाजवून थांबवण्याचा इशारा केला परंतु चालक गजानन भास्कर जाधव (रा.उस्वद) याने शासकिय वाहन पाठीमागून वळून पाहिले व ट्रॅक्टर न थांबविता आणखी भरधाव वेगाने व धोकादायक स्थितीत सुमारे दीड ते दोन किलोमीटर हनुवतखेडा रोडने पळवले. पथकाच्या शासकीय वाहनाला ओव्हरटेकची संधी न देता रस्त्याच्या डाव्या बाजुला शिवाजी माधवराव सरोदे व इतर यांच्या शेताकडे जाणारा ओबडधोबड अरुंद अशा माळरान रस्त्याने भरधाव वेगाने पळविला.

मुख्य रस्त्यापासून अंदाजे अर्धा ते एक किलो मीटर आत जाताच वाळुसह ट्रॉली पलटी झाली. त्या दरम्यान पथकाच्या पाठीमागून दोन मोटार सायकलवर आलेल्या तीन चार जणांनी पथकाच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे वेगाने जावून पथकाची गाडी घटनास्थळी पोहचण्यापूर्वी ट्रॅक्टर पासून ट्रॉली बाजुला काढली व त्याचवेळी चालक गजानन भास्करराव जाधव व इतर चार जणांनी ट्रॅक्टर व मोटारसायकलसह पळून गेले.

याप्रकरणी नायब तहसिलदार प्रविण नारायणराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक गजानन भास्कर जाधव यांच्यासह पाच जणांवर मंठा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!