महाराष्ट्र
Trending

मंठ्याच्या आठवडी बाजारात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या बीडच्या दोघांची धुलाई !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- मंठ्याच्या आठवडी बाचारात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या बीडच्या दोघांची नागरिकांनी धुलाई केली. त्यानंतर त्या दोघांना मंठा पोलिसांच्या हवाली करण्यात आले. किरण सांताराम गुंजाळ (रा. गांधीनगर बीड ता जि बीड), सुंदर बापु गुंजाळ (रा. माऊली नगर बीड ता जि बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

सोनाजी लक्ष्मण वरकड (वय 45 वर्ष व्यवसाय व्यापार रा. माळतोंडी ता मंठा जि जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, बैल, गाय, म्हैस जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करून त्यातून मिळणा-या उत्पन्नातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. दिनांक 25/08/2023 रोजी सकाळी सात वाजता सोनाजी लक्ष्मण वरकड हे मंठा येथे आठवडी बाजार असल्याने दोन म्हैस घेऊन मंठा येथील बैलजारात गेले होते.

दुपारी एक वाजेच्या सुमारास जनावरे विक्री झाले. त्यानंतर सोनाजी लक्ष्मण वरकड हे दुपारी तीन वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जाण्यासाठी निघाले. यावेळी सोनाजी लक्ष्मण वरकड यांच्या शर्टाच्या वरच्या खिशामध्ये ओपो कंपनीचा मोबाईल ठेवला होता. बाजारात जात असतांना भुतडा यांच्या घराजवळ गर्दीत असतांना तेथे कोणीतरी सोनाजी लक्ष्मण वरकड यांच्या शर्टाच्या खिशात हात घालून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात आले.

तेंव्हा सोनाजी लक्ष्मण वरकड यांनी लगेच मागे वाळून पाहिले असता एका जणाने सोनाजी लक्ष्मण वरकड यांच्या खिशात हात घातलेल्या चोरट्याला पकडले होते व त्याच्या सोबत एक अनोळखी होता. दोघांना जागीच पकडले. तेंव्हा तेथे गर्दी झाली व काही लोकांनी त्या दोघांना चोर आहे, मारा यांना असे म्हणुन मारहाण केली. तेथील काही लोकांनी मध्यस्थी करून सोडवा सोडवी केली. त्यानंतर त्या दोघांना पोलीस ठाणे मंठा येथे आणले असता पोलीसांनी चौकशी केली असता त्यांची नावे 1) किरण सांताराम गुंजाळ (रा. गांधीनगर बीड ता जि बीड), 2) सुंदर बापु गुंजाळ (रा. माऊली नगर बीड ता जि बीड) असे समजले.

सोनाजी लक्ष्मण वरकड (वय 45 वर्ष व्यवसाय व्यापार रा. माळतोंडी ता मंठा जि जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंठा पोलिस स्टेशनमध्ये किरण सांताराम गुंजाळ (रा. गांधीनगर बीड ता जि बीड), सुंदर बापु गुंजाळ (रा. माऊली नगर बीड ता जि बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!