महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे पाटलांचा अर्धवट कुणबी प्रमाणपत्र वाटपाला कडाडून विरोध ! अधिकाऱ्यांनी ते वाटूसुद्धा नाही, तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाही !!

महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या

Story Highlights
  • जर तुम्ही विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर १ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून मी पाणी सोडणार, असेही जरांगे पाटील म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 13 हजार 498 जुन्या कुणबी नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ज्यांच्या नोंदी आढळल्या त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचा हा निर्णय मराठा समाजातील गोरगरीबांवर अन्याय करणारा आहे. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर करा अन्यथा मी १ नोव्हेंबरच्या सध्याकाळपासून पाण्याचा त्याग करणार असल्याची घोषणा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील केली. राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाचा जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना कडाडून विरोध केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणारपण नाही. संबंधीत अधिकार्यांनी ते वाटूसुद्धा नाही. तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाही. सरकारने उद्याच्या उद्या (१ नोव्हेबर रोजी) विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करावी. न्यायमूर्ती शिंदे समितीला राज्याचा दर्जा देवून त्यांच्या अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. आज रात्री आणि उद्या (१ नोव्हेंबर) दिवसभरात जर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय नाही घेतला तर उद्या सध्याकाळी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळपासून मी पाणी सोडणार (पाण्याचा त्याग करणार), अशी जाहीर घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

राज्य सरकारला महाराष्ट्रात शांततता नांदू द्यायची नाही असा सरकारचा अंदाज आहे. त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जाणून बुजुून मराठ्यांवर व त्यांच्या जातीवर वर्षांनुवर्षे अन्याय करत आहात. परंतू आता आम्ही अन्याय सहन करणार नाही. जर तुम्ही विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर १ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून मी पाणी सोडणार, असेही जरांगे पाटील म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!