महाराष्ट्र
Trending

बीडची संचारबंदी फंचारबंदी तिकडं बाजूला ठेवा, त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही ! आमच्या गरिबांच्या आंदोलक पोरांना त्रास दिला तर कलेक्टर, एसपीच्या दारात येवून बसणार, मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगेचा इशारा ! मुख्यमंत्री साहेब बीडच्या कलेक्टर आणि एसपीला तंबी द्या !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – मराठ्यांचं आंदोलन आधी आहे नंतर तुम्ही संचारबंदी लावली. बीड जिल्ह्यांत संचारबंदी लावली त्याबद्दल आमचं काही मत नाही. ते कुणी केलं काय केलं माहित नाही. परंतू आमच्या आंदोलक गोरगरिबांच्या लेकरांना जर त्रास दिला तर मी स्वत इथून उठल आणि बीडचे कलेक्टर आणि एसपीच्या दारात जावून बसेल. मग तिथं १० लाख लोकं येणार की ५ लाख लोकं येणार हे मला माहित नाही. पण मी जर तिथं समोर येवून बसलो तर खूप फजिती होईल याची काळजी घ्या. सरकारला आणि मुख्यमंत्र्यांनाही सांगतो बीडचा जो काही प्रकार झालाय तो ताबडतोब थांबवा आणि तुमच्या एसपीला आणि कलेक्टरला तंबी द्या, असा इशारा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला व बीडच्या प्रशासनाला दिला. ३१ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी जरांगे पाटील यांनी संवाद साधला.

बीड जिल्ह्यात काल जी जाळपोळ झाली त्याच समर्थन मनोज जरांगे पाटील यांनी केलं नाही. परंतू ती जाळपोळ कोणी केली का केली हे माहिती नाही. परंतू तुम्ही आमच्या शांततेच्या मार्गाने जी आंदोलने बीड जिल्हांत सुरु आहेत त्या आंदोलनकर्त्यांना त्रास देवू नका. आधी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत नंतर तुम्ही संचारबंदी लावली आहे याचा जरा विचार करा, असेही जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री व बीडच्या जिल्हा प्रसासनाला जाहीररित्या सांगितले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यांत संचारबंदी लावली त्याबद्दल आमचं काही मत नाही. ते कुणी केलं काय केलं माहित नाही. परंतू गोरगरिबांच्या लेकरांना तुमचे पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांना विशेष करून सांगतो त्यांना आंदोलन न करू देणे हे प्रकार तातडीने बंद करायला लावा. नसता आंदोलन आधी आहे नंतर तुम्ही संचारबंदी लावली आहे. त्याच्यामुळं तुमची संचारबंदी फंचारबंदी तिकडं बाजूला ठेवा. जर तुम्ही एखाद्या पोरांवर गुन्हा दाखल केला त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी स्वत: इथून उठल आणि बीडच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्यासमोर जावून बसेल. मग तिथं १० लाख लोकं येणार की ५ लाख लोकं येणार हे मला माहित नाही.

मी जर बीडला येवून बसलो तर खूप फजीती होईल- पण मी जर तिथं समोर येवून बसलो तर खूप फजिती होईल याची काळजी घ्या. मी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांच्याही दारात जावून बसू शकतो. तुम्ही तुमची संचारबंदी अमकं तमकं काय राबवायचं ते राबवा. परंतू जर माझ्या महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाला त्रास झाला तर सरकारसह संबंधीत प्रशासनाने जर आम्हाला त्रास दिला तर आम्ही सुद्धा तुम्हाला गप बसू देणार नाही.

याला धमकी समजू नका, मग तुम्हालापण सुट्टी नाही- याला धमकी समजू नका. कारण आम्हाला त्रास देतान तर मग तुम्हाला पण सुट्टी नाही. आम्ही आतापर्यंत खूप सहन केलं पण आता सहन करणार नाही. कारण तुम्हाला काय गरज नव्हती त्या केजच्या लोकांना उचलायची. किंवा ते आंदोलन मो़डीत काढायची. त्यांना शांततेच्या पद्धतीने आत्ताच्या आत्ता आंदोलन करू द्या. अन्यथा उद्या तुमच्याकडे बघीतल्याशिवाय मी राहणार नाही. मी स्वत: तिकडं येणार. मग तुम्हाला कळेल की जनता काय असती आणि मराठे काय असते ते. तुम्ही शहाणे व्हा.

तुमचे एसपी आणि कलेक्टर किती हुश्शार आहे हे आम्हाला चांगलं माहितीय- सरकारला आणि मुख्यमंत्र्यांनाही सांगतो बीडचा जो काही प्रकार झालाय तो ताबडतोब थांबवा आणि तुमच्या एसपीला आणि कलेक्टरला तंबी द्या. तुमचे एसपी आणि कलेक्टर किती हुश्शार आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे. कारण त्यांना मराठा आणि कुणबी यासंदर्भातील पुरावे मागितले होते यावर त्यांनी सांगितले की बीड जिल्ह्यात काहीच नाही. इतके जातीयवादी अधिकारी असतेत हे आम्ही पहिल्यांदा बघितलं. त्यावेळेस आमच्या वैयक्तिक अभ्यासकांनी शोधले. त्यावेळेस नुसत्या गेवराईत १० हजार पुरावे निघाले. मग तुमच्या इतके जातीयवादी असतेत हे पहिल्यांदा बघितलं. अधिकारी कधीच जातीयवादी नसतात ते सगळ्यांचे असतात. याचंही अधिकार्यांनी भान ठेवावं. बीडसह महाराष्ट्रात कुठंही मराठा आंदोलकांना जर तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जशास तसं उत्तर मिळणार, हे मुख्यमंत्र्यांना मी जाहीर सांगतो, असेही जरांगे म्हणाले.

तुमची संचारबंदी असेल ती राहू द्या पण आमचं आंदोलन अगोदर आहे हे ध्यानात घ्या- आम्ही जर शांततेत आंदोलन करीत असताना तुम्ही जर आम्हाला त्रास देणार असाल तर हे मुख्यमंंत्र्यांनी अगोदर समजून घ्यावं. मुख्यमंत्री यांना स्पष्ट सांगतो आम्ही शांततेत आहोत जर आम्हाला त्रास दिला तर मग आमचा नाईलाज आहे. तुम्ही तुमच्या लोकांना आज रात्रीतून सगळ्यांना तंबी द्या तुमची संचारबंदी असेल ती राहू द्या पण आमचं आंदोलन अगोदर आहे नंतर तुमची संचारबंदी. त्याच्यामुळं बीडसह महाराष्ट्रातील एकाही मराठा आंदोलकांना त्रास देवू नका, अन्यथा पुढची जबाबदारी ही सरकारची राहील.

Back to top button
error: Content is protected !!