महाराष्ट्र
Trending

मराठा आरक्षण पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची कुजबुज व्हायरल, शिंदे म्हणाले, बोलून आपण मोकळं निघून जायचं, अजितदादा म्हणाले हो तर फडणवीस म्हणाले माईक चालू आहे ! एकनाथ शिंदेचे तातडीने स्पष्टीकरण म्हणाले: मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत !!

राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ – मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कुजबुजचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिंदे म्हणाले, बोलून आपण मोकळं निघून जायचं, यावर अजितदादा एस असे म्हणताना दिसतात तर देवेंद्र फडणवीसांनी लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसारमाध्यमांचे माईक चालू असलाच्या सूचित केले. बोलून आपण मोकळं निघून जायचं याचा प्रत्येकजण सोशल मीडियावर आपआपल्या परिने तर्क लावत आहे. एकंदरीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची पत्रकार परिषदेपूर्वीची ही कथित कुजबूज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मराठा समाजातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्हायरल व्हिडियोवर तातडीने स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले घडलेले मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटलांचे ३० ऑगस्टपासून उपोषण चालू आहे. शांततेच्या मार्गाने सुरु असलेले हे उपोषण मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मंडपात घुसून १ सप्टेंबर रोजी अमानुष लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जच्या निषेधार्थ संपूर्ण मराठवाड्यात पडसाद उमटले. सराकारने आंदोलनकर्त्यांना लाडीगोडी लावण्यासाठी जालना जिल्ह्याच्या एसपींना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षिय नेत्यांची बैठक घेवून आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय घेतला. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्यांची मुदत मागून उपोषण मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली होती.

ही पत्रकार परिषद काल, १२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यापूर्वी खुर्चीवर आसनस्थ होताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कुजबुज सुरु होती. ही कुजबुज सुरु असताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्याचे रेकॉर्डिंग सुरु होते. ही कुजबुज एका व्हिडियोच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडियोतील संवाद असा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बोलून आपण मोकळं निघून जायचं, यावर अजितदादा एस असे म्हणताना दिसतात तर देवेंद्र फडणवीसांनी लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माईक चालू असलाचे सूचित केले. तिघांच्या या कुजबुजीचा हा व्हायरल व्हिडियो सोशल मीडियावर चर्चेचा ठरत आहे. बोलून आपण मोकळं निघून जायचं या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा ? असा सवाल मराठा समाजातून उपस्थित करून मुख्यमंत्र्यांच्या या कथित व्हिडियोवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 13 : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाजबांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

घडलेले मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत असताना या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार योग्य नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मक बोलू या, अशी चर्चा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार करीत असताना आमचा संवाद ‘सोशल मीडिया’वरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली आणि सकारात्मक भूमिका घेतली असताना, संवादाचा मार्ग प्रशस्त केला असताना खोडसाळपणे आणि व्हीडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत.

आपल्या राज्याची ही संस्कृती नाही. राज्यात असलेले सकारात्मक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाहन केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!