महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे पाटील सलाईनवर, उपोषणाचा नववा दिवस ! सरकारला फुटला घाम, मंत्रालयात हालचालींना वेग !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ -: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने डॉक्टरांनी त्यांना उपोषणस्थळीच सलाईन चढवले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकार काढत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही या भूमीकेवर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने सरकारला चांगलाच घाम फुटला असून मंत्रालयात सरकार व प्रशसनाच्या हालचाली वाढल्या आहेत.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या उपोषणाच्या मंडपात घुसून पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जच्या निषेधार्थ व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहे. दरम्यान, उपोषणाचा आज, नववा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी पाण्याचाही त्याग केला आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. स्थानिक डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून त्यांना उपोषस्थळीच सलाईन चढवले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील मराठा अध्यादेशाच्या मागणीवर ठाम असल्याने सरकारची चांगलीच पाचावर धारण बसली आहे. या उपोषणात पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत असतानाच सरकारला चांगलाच घाम फुटला आहे. इकडे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असून मंत्रालयात प्रशासनाची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. सरकारच्या वतीने मंत्री गिरीष महाजन, अर्जून खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची गळ घातली. मात्र, जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिल्याने सरकार आता संकटात सापडले आहे.

नऊ दिवसांपासून जरांगे पाटील यांनी अन्नत्याग केला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने काल, ४ सप्टेंबर रोजी भेट घेतली होती त्यावेळी जरांगे पाटील यांनी ४ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. जर चार दिवसांत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर पाणीसुद्धा पिणार नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. यामुळे सरकार अॅक्शन मोडवर आले आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!