छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

फुलंब्री तालुक्यातील पाल फाट्यावर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळेंनी स्वत:ची कार पेटवून मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा केला निषेध !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २- फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा येथे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी त्यांची स्वत: कार पेटवून जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध केला.

विहिर अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश करून पंचायत समिती कार्यालयासमोर नोटांची उधळन करून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी यावेळीही वेगळे आंदोलन करून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान न करता त्यांनी स्वतहाच्याच कारला इंधन ओतून पेटवून दिले. याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आज, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाल फाटा येथे रस्त्यावर आपली कार उभा केली. त्यानंतर या कारला त्यांनी पेटवून एक मराठा लाख मराठा अशा गगणभेदी घोषणा देवून जालन्यातील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा तीव्र शब्दात निषेध केला. रेनॉल्डची एम एच २० एफ वाय ४९६४ या स्वताहाच्या कारला त्यांनी पेटवून दिले.

या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांना ताब्यात घेऊन त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस देवून त्यांना सोडून दिले. रस्त्यावरील पेटवलेली कार बाजूला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करून देण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनाचा व्हिडियो सोशल मीडियावर वार्यासारखा व्हायरल होत आहे.

Back to top button
error: Content is protected !!