महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे पाटलाच्या अंतरवाली सराटीतील उपोषणाचा सरकारने घेतला धसका ! मराठा आरक्षण संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची सोमवारी मुंबईत तातडीची बैठक !!

मुंबई, दि. 28 : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत (जि. जालना) सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा धसका राज्य सरकारने घेतला असून मराठा आरक्षण संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची सोमवारी मुंबईत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.

या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने आतापर्यत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. असेही मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!