छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ क्रांतीचौकातून विराट मोर्चा, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही शहरातील रस्त्यांवर भगवं वादळ !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असेच राहावे या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज, १९ मार्च रोजी सकाळी शहरात विराट मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांनी या मोर्चास परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतरही सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास पोलिसांनी कुठेही अडवलं नाही. प्रचंड उत्साह, युवक व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग, जय भवाणी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणा आदी वैशिष्ट्यांनी हा मोर्चा लक्षवेधी ठरला.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले. नामांतराचा हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला. हा प्रस्ताव केंद्र सरकारनेही स्वीकारला व त्यास मान्यता दिली. त्यानंतर औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाले.

या नामांतराच खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला. या नामांतराच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. दरम्यान कॅंडल मार्चही काढण्यात आला.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर या नावाच्या समर्थनार्थ सकल हिंदु समाजाने पोलिसांकडे मोर्चाची परवानगी मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतरही सकल हिंदू समाजाच्या वतीने आज, १९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास क्रांतीचौकातून विराट मोर्चाला सुरुवात झाली.

हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी औरंगपुराच्या दिशेने निघाले. जय भवानी जय शिवाजीच्या गगणभेदी घोषणा देण्यात आल्या. भगवा झेंडा, टाळ मृदंगांचा गजर करत हा विराट मोर्टा क्रांतीचौकातून मार्गस्थ झाला. जिल्हा कोर्ट, निराला बाजार, विवेकानंद कॉलेज या मार्गाने औरंगपुरा येथे पोहोचणार आहे. तेथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेनंतर या मोर्चाची सांगता होणार आहे.

विशेष म्हणजे परवानगी नाकारल्यानंतरही पोलिसांनी या मोर्चाला कुठेही अडवलं नाही. या मोर्चात युवक व महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. प्रचंड उत्साह व छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ घोषणांनी शहर दुमदुमून गेले.

Back to top button
error: Content is protected !!