संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – एम.जी.एम. हॉस्पिटलच्या डॉक्टरची मोपेड गेटसमोरून चोरट्याने हातोहात लांबवली. हॉस्पिटल गेट क्र. 01 च्या बाहेर रोडवर हॅन्डललॉक करून उभी केलेली मोपेड चोरट्याने चोरून नेली.
यासंदर्भात डॉक्टर गुरमोहन गुलशरन सेठी (रा. माय वल्ड, फ्लॅट नं. 201 1, B-6, एअरपोर्ट च्या समोर, जालना रोड, चिकलठाणा) हे एम. जी. एम हॉस्पिटल मध्ये नोकरी करतात. त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतलेली मोपेड (G101-SG-2764) गुजरात राज्य पासिंगची अॅक्टीवा डॉक्टर गुरमोहन सेठी वापरतात.
दि. 11/12/2022 रोजी वेळ सकाळी 11.45 वाजे दरम्यान डॉक्टर गुरमोहन सेठी यांनी एम.जी.एम. हॉस्पिटल गेट क्र. 01 च्या बाहेर रोडवर हॅन्डललॉक करून मोपेड उभा करून हॉस्पिटलमध्ये गेले. त्यानंतर ड्युटी संपल्यावर घरी जाण्यासाठी निघाले असता दुपारी 02.00 वाजेदरम्यान डॉक्टर गुरमोहन सेठी यांना त्यांची मोपेड त्या ठिकाणी दिसली नाही.
याप्रकरणी डॉक्टर गुरमोहन गुलशरन सेठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe