गंगापूर
Trending

गंगापूरचा कृषी पर्यवेक्षक लाच घेताना पकडला ! पावर टिलर व स्प्रिंकलर सबसिडीसाठी घेतले ३ हजार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – गंगापूरचा कृषी पर्यवेक्षक लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. पावर टिलर व स्प्रिंकलर सबसिडीसाठी ३ हजार रुपये घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

शामकुमार ज्ञानदेव काळे (वय 43 वर्षे, पद व्यवसाय नोकरी पद कृषी पर्यवेक्षक, ता कृषी कार्यालय गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या नांवावर राज्य कृषी यांत्रीकिकरण योजने अंतर्गत पावर टिलर व स्प्रिंकलर या घटकासाठी राज्य शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर सादर केलेल्या पावर टिलर अर्जाची लकीड्रामध्ये निवड झाली होती.

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या पावर टिलर वर व स्प्रिंकलर वर शासकिय नियमानूसार सबसिडी मिळण्यासाठी प्रत्यक्ष पहानी करून प्रकरण मंजुरीसाठी पुढे सादर करण्यासाठी 3000 हजार रुपयाची मागणी करून पंच साक्षीदार समक्ष 3000/- हजार रुपये लच स्वीकारली.

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक रुपचंद वाघमारे, पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोना. सुनील पाटील, सुनील बनकर पो.अं विलास चव्हाण यांनी ही कारवाई केली.

Back to top button
error: Content is protected !!