गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

प्रेमसंबधातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या गंगापूर तालुक्यातील संशयिताला पुण्यातून ताब्यात घेतले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – प्रेमसंबधातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या गंगापूर तालुक्यातील संशयिताला पुणे जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलगी व संशयिताचा कारेगाव ता. शिरुर जिल्हा पुणे येथे जावून दोघांनाही ताब्यात घेतले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी संभाजीनगर लाईव्हला दिलेली माहिती अशी की, पोलीस ठाणे एम. आय. डी. सी वाळूज, औरंगाबाद शहर येथे दिनांक – २७/०१/२०२२ रोजी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेले तक्रारी वरून नितीन कडुबा चव्हाण (वय २२ वर्षे रा वसंतनगर पो स्टे अन्सरवाडी ता. चिखली जि. बुलढाणा, ह.मु जोगेश्वरी ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याच्या विरुध्द मुलीला प्रेमसंबधातून पळवून नेल्या बाबतचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील मुलीचा व संशयिताचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष औरंगाबाद शहर येथे पुढील तपास कामी पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी वाळूज येथून दिनांक ०३/०२/२०२३ रोजी वर्ग करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात अनैतिक मानवी वाहतुक कक्षाच्या पथकाने बारकाईने तपास केला. सदर गुन्हयातील अल्पवयीन मुलगी व संशयित नितीन कडुबा चव्हाण यांचा कारेगाव ता. शिरुर जिल्हा पुणे येथे जावून शोध घेतला. सदर गुन्हयातील पीडित मुलगी व संशयित नितीन कडुबा चव्हाण यांना कारेगाव ता. शिरुर जिल्हा पुणे येथून ताब्यात घेतले.

सदर गुन्हयात अनैतिक मानवी वाहतुकचा कोणताही प्रकार घडल्याचे दिसून येत नसल्याने अल्पवयीन मुलगी व संशयित पोलीस ठाणे एम. आय. डी. सी वाळुज येथे हजर केले. सदर गुन्हा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष औरंगाबाद शहर यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयात पुढील तपास पोलीस ठाणे एम. आय. डी. सी वाळुज हे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता,  अपर्णा गिते पोलीस उपायुक्त (मुख्यालय), यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे शिवाजी तावरे पोलीस निरीक्षक सुषमा पवार, सफौ इसाक पठाण, पो ह डी. डी खरे, पो ह संतोष त्रिभुवन, मपोह जयश्री खांडे तसेच सायबर सेल टीम, चालक पोलीस अंमलदार धोंडे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!