छत्रपती संभाजीनगर
Trending

औरंगाबाद शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल ! शिवजयंतीनिमित्त उद्या हे मार्ग राहतील बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग !!

जगात भारी १९ फेब्रुवारी... माझ्या राजाची जयंती..!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – जगात भारी १९ फेब्रुवारी. अर्थात जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर उद्या, १९ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून पर्यायी मार्गही उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे प्र. सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली.

औरंगाबाद शहरात “श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती” निमित्त दिनांक १९/०२/२०२३ रोजी सालाबादप्रमाणे उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या निमीत्ताने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात. सदर मिरवणुका दरवर्षी सकाळी ११.०० वाजे पासून रात्री २४.०० वाजे पर्यंत, संस्थान गणपती ते क्रांतीचौक, सिडको- हडको, टि.व्ही सेन्टर व गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात. वरील नमुद ठिकाणी निघणा-या मिरवणुका पाहण्यासाठी औरंगाबाद शहर व परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होवून, नागरिकांच्या सुरक्षितेस, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, म्हणून मिरवणुक मार्गावर वाहतूकीचे विनियम व नियमन करणे
आवश्यक असल्याचे वाहतूक शाखेने म्हटले आहे

दिनांक १९/०२ / २०२३ रोजी सकाळी ११.०० ते २४.०० वाजे पर्यंत, खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

१) राजाबाजार चौक- संस्थान गणपती- शहागंज- सिटीचौक – गुलमंडी- पैठणगेट- सिल्लीखाना- क्रांतीचौक-गोपाल टी.

२) सिडको एन-१२ नर्सरी – टि. व्ही. सेंन्टर – जिजाऊ चौक- एम-२- एन-९- शिवनेरी कॉलनी- पार्श्वनाथ चौक- बळीराम पाटील चौक- बजरंग चौक – अविष्कार चौक – शिवाजी महाराज पुतळा – चिस्तीया चौक.

३) जयभवानी नगर चौक – गजानन महाराज मंदिर व सेव्हनहील उड्डाणपुल- आदिनाथ चौक.

पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल :-
१) शहागंज ते सिटीचौककडे येणारी वाहने चेलीपुरा – लोटा कारंजा – कामाक्षी लॉज या मार्गाचा वापर करतील.

२) क्रांतीचौक ते सिटीचौक कडे जाणारी वाहने सावरकर चौक – कार्तिकी हॉटेल चौक – मिलकॉर्नर – भडकल गेट या मार्गाचा वापर करतील.

३) मिलकॉर्नर कडून औरंगपुराकडे येणारी वाहने अंजली टॉकीज समोर उजवीकडे नागेश्वरवाडी- निराला बाजार- समर्थनगर- मार्गे किंवा अंजली टॉकीज जवळ डावीकडे खडकेश्वर म.न.पा. मार्गे जातील.

४) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टि.व्ही. सेंटरकडे जाणारी वाहने अण्णाभाऊ साठे चौक- उध्दवराव पाटील चौक – सिध्दार्थ नगर चौक या मार्गाचा वापर करतील.

५) जयभवानी नगर ते गजानन महाराज मंदीरकडे येणारी व जाणारी वाहने जालना रोड मार्गाचा वापर करतील.

६) जवाहरनगर पो. स्टे. ते सेव्हनहीलकडे येणारी वाहने माणिक हॉस्पिटल, त्रिमूर्ती चौक मार्गे जातील व येतील.

बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील. सदर अधिसुचना ही पोलीस, रुग्णवाहीका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागु राहणार नाही. या अधिसुचनेचा भंग करणारी व्यक्ती मो. वा. कायदा, म.पो. कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे प्र. सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिले.

Back to top button
error: Content is protected !!