छत्रपती संभाजीनगर
Trending

ज्ञानदीप प्राथमिक शाळेतील शिक्षकाचे अश्लिल चाळे, विद्यार्थासही केली बेदम मारहाण ! छत्रपती संभाजीनगरमधील लैंगिक छळाच्या घटनेने शैक्षणिक जगताला हादरा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – ज्ञानदीप प्राथमिक शाळेतील (प्रकाशनगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) शिक्षकाने दोन मुलींशी केलेल्या अश्लिल चाळ्यांमुळे संपूर्ण शैक्षणिक जगतात एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर या शिक्षकाने विद्यार्थ्यास प्रमाणापेक्षा जास्त मारहाण केल्याचे मुख्यध्यापकाने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

विजय सीताराम हिवाळे (संघर्ष नगर मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या प्रकाश नगर येथील शाळेत शिक्षक असलेले विजय सिताराम हिवाळे हे दि 08/04/23 रोजी पाचवीच्या वर्गातील दोन मुलींची अश्लील चाळे करताना फिर्यादीच्या निदर्शनास आले. यानंतर सदर शिक्षक विजय हिवाळे हे दि.23/06/23 रोजी वर्गातील एका मुलाला आवश्यकतेपेक्षा जास्त मारहाण करताना दिसून आले.

याप्रकरणी मुख्याध्यापक संजय सुदामराव मगरे (ज्ञानदीप प्राथमिक शाळा प्रकाशनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय सीताराम हिवाळे (संघर्ष नगर मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुं.रं.न. 299/2023 कलम 354(A)323भा.द.वी सहकलम 9,10 पोक्सो सहकलम RTE Act 17, 2009 नुसार मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाला असून पुढील तपास कामी पोउपनि गुळवे हे करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!